शहरं
Join us  
Trending Stories
1
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
2
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे
3
Pakistan Water : पाकिस्तानमध्ये पाण्याचं संकट वाढलं! भारतासोबतचा संघर्ष महागात पडला
4
नवी मुंबईतील शिक्षिकेचं अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत घाणेरडं कृत्य, वडिलांनी बघताच पोलीस स्टेशन गाठले!
5
पत्नी झाली बेवफा! पतीला दारू पाजली अन् नाल्यात ढकलून दिलं; प्रियकरासोबत पळणारच होती, पण...
6
फराह खानचा कुक दिलीपचा पगार किती? आयटी कंपनीतील कर्मचाऱ्याची सॅलरी पण पडेल फिक्की!
7
शेअर बाजारात NSDL ची होणार CDSL शी टक्कर; ग्रे मार्केटमध्ये काय संकेत, किती गुंतवणूक करावी लागणार?
8
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सोशल मीडिया वापराबाबत नवे नियम; उल्लंघन केल्यास नोकरी गमवाल!
9
लस्सीवरून दुकानदारांमध्ये तुफान राडा, एकमेकांवर लाठ्याकाठ्या, दगड विटांनी केला हल्ला
10
प्रियंका गांधी म्हणाल्या, 'मी शिवस्तोत्र म्हणून आलेय'; लोकसभेत नेमकं काय घडलं?
11
३ दिवसांच्या घसरणीला ब्रेक, टाटा-रिलायन्ससह 'या' शेअर्समुळे गुंतवणूकदारांना दिलासा! तुमच्या पोर्टफोलिओचं काय झालं?
12
आमिर खानने घेतला मोठा निर्णय, अभिनेत्याने सुरू केलं 'जनता का थिएटर'
13
"ऑपरेशन महादेव कालच का झालं?"; अखिलेश यादवांनी सरकारला घेरलं, पुलवामा हल्ल्यातील 'त्या' गाडीबद्दल काय बोलले?
14
शैलेश जेजुरीकर बनले 'या' अमेरिकन कंपनीचे CEO! मायक्रोसॉफ्ट, गुगलनंतर आता P&G लाही मिळणार 'भारतीय' नेतृत्व!
15
Tripti Dimri : "मी ३० वर्षांपासून गप्प...", तृप्ती डिमरीने खूप काही केलंय सहन, का नाही उठवला आवाज?
16
Russia Ukraine War: "हल्ले थांबवा अन्यथा..."; रशिया-युक्रेन युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्पकडून पुतिन यांना इशारा!
17
BCCI च्या ऑफिसमध्ये चोरी; सुरक्षा रक्षकाने लाखोंच्या IPL जर्सी चोरुन हरयाणात विकल्या
18
"कलंकित मंत्र्यांचा राजीनामा न घेणाऱ्या सरकारने गोमूत्र शिंपडून त्यांना पवित्र करून घ्यावे", विजय वडेट्टीवार यांची टीका
19
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
20
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?

Gaganyaan: ISRO च्या यशाला एलन मस्कची दाद; 'विकास इंजिन'च्या चाचणीनंतर 'तिरंगा' वापरून ट्विट

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2021 19:20 IST

Gaganyaan: एलन मस्क यांनी ट्विट करत ISRO ला शुभेच्छा दिल्या आहेत.

ठळक मुद्देएलन मस्कने दिल्या ISRO ला शुभेच्छागगनयान मोहिमेला समर्थन दर्शवलेISRO कडून विकास इंजिन चाचणी यशस्वी

नवी दिल्ली: आताच्या घडीला भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजे ISRO च्या गगनयान मोहिमेची जय्यत तयारी सुरू आहे. इस्रोचे मानवरहित गगनयान डिसेंबरमध्ये अवकाशात झेपावणार आहे. इस्रोने विकास इंजिनच्या तिसऱ्या लांब पल्ल्यासाठीचे तापमान परीक्षण केले. गगनयान मोहीमेसाठी या इंजिनाचा वापर केला जाणार आहे. यावर टेस्ला आणि स्पेस एक्सचे प्रमुख एलन मस्क यांनी प्रतिक्रिया दिली असून, गगनयान मोहिमेला समर्थन दर्शवत इस्रोचे कौतुक केले आहे. (after vikas engine test success elon musk shows support to isro for gaganyaan mission)

गगनयान मोहिमेतील एक महत्त्वाचा टप्पा बुधवारी पार पडला. 'इस्रो'चे द्रवरूप इंधनावर आधारित विकास इंजिन हे मानवी श्रेणीच्या रॉकेटचे निकष पूर्ण करते की नाही, हे तपासण्यासाठी महेंद्रगिरी येथे चाचण्या पार पडल्या. विकास इंजिनाची सलग तिसऱ्यांदा चाचणी यशस्वी झाली. यानंतर एलन मस्क यांनी ट्विट करत इस्रोला शुभेच्छा दिल्या आहेत. 

TATA ग्रुपमध्ये पार्टनर होण्याची उत्तम संधी! केवळ १० हजार गुंतवा आणि मोठी कमाई करा

इस्रोची अद्भूत कामगिरी

इस्रोने केलेली कामगिरी अतिशय अद्भूत असून, खूप प्रभावी असल्याचे ट्विट एलन मस्क यांनी केले आहे. इतकेच नव्हे, तर दुसऱ्या एका ट्विटमध्ये भारताच्या तिरंगा ध्वजासह शुभेच्छाही दिल्या आहेत. विकास इंजिनाच्या यशस्वी चाचणीनंतर इस्रोने या परीक्षणाबाबत ट्वीटरवर माहिती दिली होती. इस्रोच्या 'जीएसएलव्ही मार्क-३  रॉकेटची संपूर्ण रचना आणि निर्मिती स्वदेशी असून, त्यामध्ये 'इस्रो'तर्फे १९८०च्या दशकात विकसित करण्यात आलेल्या विकास इंजिनाची महत्त्वाची भूमिका आहे.

गगनयानच्या माध्यमातून माणूस अंतराळात जाणार

 इस्रो गगनयानच्या माध्यमातून माणसाला अंतराळात घेऊन जाणं, तसेच तिथून परत आणण्यासाठी काम करत आहे. विकास इंजिन २४० सेकंद चालवण्यात आले. यावेळी इंजिन व्यवस्थित काम करत असल्याचे इस्रोकडून सांगण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ ऑगस्ट २०१८ रोजी स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात या मोहिमेची घोषणा केली होती. 

ठरलं! ‘या’ महिन्यात येणार LIC चा IPO; केंद्राची मंजुरी, नितीन गडकरींचाही सहभाग

दरम्यान, मानवी अवकाश मोहीम भारताच्या स्वातंत्र्याच्या पंचाहत्तरी अगोदर म्हणजे १५ ऑगस्ट २०२२ अगोदर व्हावी असे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. इस्रो या मोहिमेत फ्रान्स, रशिया, अमेरिका यांच्या अवकाश संस्थांची मदत घेत असून, काही घटक हे देश पुरवणार आहेत.   

टॅग्स :isroइस्रोCentral Governmentकेंद्र सरकार