वीस वर्षांनंतर मध्य प्रदेशला मिळाले दुसरे रामसर स्थळ

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2022 12:08 PM2022-07-28T12:08:26+5:302022-07-28T12:09:09+5:30

जिनेव्हास्थित रामसर परिषदेने पाणथळ संवर्धनाच्या विशेष प्रयत्नासाठी  सांख्य सागर सरोवराला ‘रामसर’चा दर्जा देण्यात आला आहे.

After twenty years, Madhya Pradesh got the second Ramsar site | वीस वर्षांनंतर मध्य प्रदेशला मिळाले दुसरे रामसर स्थळ

वीस वर्षांनंतर मध्य प्रदेशला मिळाले दुसरे रामसर स्थळ

googlenewsNext

अभिलाष खांडेकर

भोपाळ :  नैसर्गिक सौंदर्याने संपन्न असलेल्या मध्य प्रदेशला तब्बल 20 वर्षांच्या खंडानंतर शिवपुरी जिल्ह्यातील जुन्या पाणथळ परिसराला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली असून, सांख्य सागर सरोवराला ‘रामसर’ स्थळाचा दर्जा देण्यात आला आहे. जिनेव्हास्थित रामसर परिषदेने पाणथळ संवर्धनाच्या विशेष प्रयत्नासाठी  सांख्य सागर सरोवराला ‘रामसर’चा दर्जा देण्यात आला आहे.

मध्य प्रदेश सरकारच्या पाणथळ प्राधिकरणाने रामसर दर्जासाठी काही पाणथळांची शिफारस करून मागच्या वर्षी पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय आणि जिनेव्हाला प्रस्ताव पाठविला होता. कोणत्याही पाणथळाची निवड रामसर स्थळ म्हणून करण्यासाठीची प्रक्रिया खूप किचकट असते. 

Web Title: After twenty years, Madhya Pradesh got the second Ramsar site

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.