शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

तिकीट वाटपानंतर गुजरात भाजपामध्ये नाराजीचे सूर, खासदाराने दिली राजीनाम्यांची धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2017 22:38 IST

गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाने उमेदवारांच्या दोन याद्या प्रसिद्ध केल्या आहेत. मात्र या याद्या प्रसिद्ध झाल्यापासून गुजरात भाजपामधून नाराजीचे सूर उमटू लागले आहेत.

अहमदाबाद - गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाने उमेदवारांच्या दोन याद्या प्रसिद्ध केल्या आहेत. मात्र या याद्या प्रसिद्ध झाल्यापासून गुजरात भाजपामधून नाराजीचे सूर उमटू लागले आहेत. त्याचच पाटण येथील भाजपा खासदार लीलाधर वाघेला यांनी तर आपल्या मुलाला तिकीट न मिळाल्यास पक्षाचा राजीनामा देण्याची धमकी दिली आहे. त्यामुळे पुढच्या काही दिवसांमध्ये पक्षातील नाराजांची समजूत काढण्यासाठी भाजपाच्या नेत्यांना धावपळ करावी लागणार आहे. गुजरात विधानसभेच्या 182 जागांपैकी एकूण 106 जागांसाठी भाजपाकडून उमेदवारांची घोषणा झाली आहे.  या घोषणेनंतर भाजपामधील नाराजी उफाळून आली आहे. काही ठिकाणी विद्यमान आमदारांना तिकीट दिल्याने कार्यकर्ते नाराज आहेत, तर काही ठिकाणी नवे उमेदवार दिल्याने नाराजीचे सूर उमटत आहेत.  गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने शुक्रवारी ७० उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. यादीत काँग्रेसमधील पाच बंडखोर व ४० विद्यमान आमदार आहेत. या यादीत भाजपने १६ नव्या चेह-यांनाही संधी दिली आहे. त्यानंतर शनिवारी भाजपाने 36 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली होती. १८२ सदस्यांच्या विधानसभेसाठी ९ व १४ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. राघवजी पटेल, धर्मेंद्रसिंह जाडेजा, रामसिंह परमार, मानसिंह चौहान आणि सी. के. रावोलजी यांचा बंडखोरांत समावेश आहे. या पाचही जणांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत, तसेच राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसकडून अहमद पटेल उभे असताना भाजपला पाठिंबा दिला होता. राजकोट (पश्चिम) मतदारसंघातून मुख्यमंत्री विजय रुपानी यांना उमेदवारी दिली गेली आहे. उपमुख्यमंत्री नितीनभाई पटेल हे मेहसाना व गुजरात प्रदेश भाजपचे अध्यक्ष जितूभाई वाघानी हे भावनगर मतदारसंघातून उमेदवार आहेत.

टॅग्स :BJPभाजपाGujarat Election 2017गुजरात निवडणूक 2017