शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

मुहूर्त ठरला! २०२४च्या संक्रांतीनंतर रामलल्ला विराजमान; 'असं' असणार राम मंदिर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2022 09:03 IST

मंदिरात दर्शनासाठी भाविकांना १६ फूट उंच जावे लागणार, मंदिर परिसराभोवतीची चारीही बाजूंची भिंत १८ फूट उंचीची असेल व त्यावर मोठमोठे वॉच टॉवर असतील

विकास मिश्र / त्रियुग नारायण तिवारीअयोध्या : बहुप्रतिक्षित श्रीराम मंदिर पूर्ण तयार होऊन त्यात २०२४ मधील मकरसंक्रांतीनंतर शुभमुहूर्तावर रामलल्ला विराजमान होतील. त्यानंतर सर्वांना त्यांचे दर्शन घेता येईल, अशी माहिती श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे विश्वस्त डॉ. अनिल मिश्र यांनी ‘लोकमत’ला दिली. मंदिराच्या पहिल्या मजल्याची उभारणी डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्ण होणार आहे. त्यानंतर रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले. 

डॉ. मिश्र यांनी सांगितले की, पहिल्या मजल्यावर १०,६५४ दगडांचा वापर केला आहे. आणखी ३,००० दगड वापरले जाणार आहेत. गर्भगृहाचे मार्बल पिलर लावणे सुरू झाले आहे. तीन बाजूंनी ३० मीटर अंतरावर रिटेनिंग वॉलची उभारणी वेगाने सुरू आहे. परिसरात १६१ फूट विजयपताका लावण्यात येणार आहे. वादळ-वाऱ्यातही ही पताका उभी राहावी, अशी व्यवस्था आहे. 

प्रवेशासाठी २ मार्ग डॉ. अनिल मिश्र यांनी सांगितले की, मंदिर परिसराभोवतीची चारीही बाजूंची भिंत १८ फूट उंचीची असेल व त्यावर मोठमोठे वॉच टॉवर असतील. लखनौच्या गव्हर्नर हाऊसमधल्याप्रमाणे या भिंती असतील. या भिंतींच्या बाहेर मानवी तपासणी करण्यात येईल व आत प्रवेश केल्यावर अत्याधुनिक यंत्रे तपासणी करतील. राममंदिरात येणाऱ्या भाविकांच्या प्रवेशासाठी दोन प्रमुख मार्ग तयार करण्यात येणार आहेत.

मंदिरावर एकूण पाच शिखरे गर्भगृहापर्यंत रामलल्लाच्या दर्शनासाठी भाविकांना १६ फूट चढावे लागेल. मंदिरावर एकूण पाच शिखरे असतील. मंदिरासाठी ३,२०० कोटी रुपयांचा निधी मिळालेला आहे. अलीकडे दानपत्रांद्वारे दररोज १५ ते २० लाख रुपये मिळत आहेत. ऑक्टोबर महिन्यात दीपोत्सव कार्यक्रम व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आगमनामुळे मंदिराला नऊ कोटी रुपयांची देणगी मिळाली आहे. 

मंदिराच्या परिसरात रात्री थांबता येणार नाहीया मंदिराच्या परिसरात राहण्यासाठी कोणत्याही प्रकारची निवासी वसाहत किंवा भवन या प्रकारचे बांधकाम उभारण्यात येणार नाही. मात्र काही खोल्या विशिष्ट अतिथींना आराम करण्यासाठी उभारण्यात येतील; परंतु तेथे रात्री थांबण्याची कोणालाही परवानगी दिली जाणार नाही. 

  • ५० हजार भाविकांसाठी प्रतीक्षालय उभारण्यात येणार
  • सर्व सोयीसुविधांनी सज्ज 
  • मोठ-मोठ्या धर्मशाळा उभारणार
  • परदेशी पर्यटकांसाठी विविध भाषांमधील ऑडिओ-व्हिडीओची व्यवस्था. विविध भाषांच्या  माहीतगारांची नियुक्ती करणार
  • वयोवृद्ध व अशक्त भाविकांसाठी लिफ्टची सोय केली जाणार 
  • मंदिरात भाविकांना प्रसाद ठेवण्याची परवानगी दिली जाणार नाही परंतु मंदिराकडून भाविकांना प्रसादाचे वाटप केले जाईल. 
  • न्यायालयांत सुरू असलेल्या विविध खटल्यांचे दस्तऐवज संरक्षित करण्यासाठी त्यांचे डिजिटायझेशन करणार