शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

कर्नाटक विधानसभा निवडणुकीनंतर विरोधी ऐक्याची रोवणार मुहूर्तमेढ; नितीशकुमारांचे संकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2023 05:46 IST

पाटण्यात होऊ शकते बैठक, विरोधी पक्षनेत्यांच्या पुढील बैठकीसाठी एकमताने पाटणा हे ठिकाण निवडले गेले तर ही बैठक येथेच होईल असं त्यांनी म्हटलं.

पाटणा - कर्नाटक विधानसभा निवडणुकीनंतर पाटणा येथे विरोधी पक्षांच्या नेत्यांची बैठक होऊ शकते, असे संकेत बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी शनिवारी येथे दिले. या बैठकीत विरोधी ऐक्य घडवून आणण्याच्या मुद्द्यावर चर्चा होण्याची शक्यता आहे, असेही ते म्हणाले. 

‘आम्ही नक्कीच एकत्र बसू आणि २०२४च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचा मुकाबला करण्यासाठी विरोधी पक्षांची एकी घडवून आणण्याच्या मुद्द्यावर चर्चा करू,’ असे नितीश म्हणाले. सध्या काही नेते (कर्नाटक) विधानसभा निवडणुकीत व्यग्र आहेत. निवडणूक आटोपल्यानंतर आम्ही बैठकीचे ठिकाण निश्चित करू. विरोधी पक्षनेत्यांच्या पुढील बैठकीसाठी एकमताने पाटणा हे ठिकाण निवडले गेले तर ही बैठक येथेच होईल. ही बैठक आयोजित करताना आम्हाला आनंद होईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

नितीश कुमार आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी २४ एप्रिल रोजी कोलकाता येथे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची भेट घेतली होती. यावेळी बॅनर्जी यांनी नितीश यांना आगामी लोकसभा निवडणुकीसाठी विरोधी ऐक्याबाबत चर्चा करण्यासाठी पाटणा येथे सर्व बिगर भाजप पक्षांची बैठक आयोजित करण्याचे आवाहन केले होते.

नितीशकुमार लालूंना भेटलेराष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव पाटण्यात परतल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी त्यांची भेट घेतली. आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपविरुद्ध देशव्यापी विरोधी आघाडी उभारण्यासाठी उभय नेते  संयुक्तरीत्या काम करण्याची शक्यता वर्तविली जात असल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांच्यात शुक्रवारी चर्चा झाली. 

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमारcongressकाँग्रेस