या मंदिरात गेल्यावर होते परदेशात जाण्याची इच्छा पूर्ण
By Admin | Updated: March 5, 2017 15:10 IST2017-03-05T15:10:34+5:302017-03-05T15:10:34+5:30
देवभोळ्या असलेल्या आपल्या देशात प्रत्येक देवतेचे आणि मंदिरांचे काही ना काही खास वैशिष्ट्य असतात.

या मंदिरात गेल्यावर होते परदेशात जाण्याची इच्छा पूर्ण
>ऑनलाइन लोकमत
अहमदाबाद, दि. 5 - देवभोळ्या असलेल्या आपल्या देशात प्रत्येक देवतेचे आणि मंदिरांचे काही ना काही खास वैशिष्ट्य असतात. भक्तांच्या मनोकामना पूर्ण करण्यावरूनही देवांची खासियत ठरत असते. असेच एक मंदिर आहे अहमदाबादमध्ये. येथील एका हनुमान मंदिरात नवस बोलल्यावर परदेशात जाण्यासाठी व्हीसा मिळतो, अशी मान्यता आहे.
व्हीसा देणारे हनुमान म्हणून हे मंदिर प्रसिद्ध असून, व्हीसासाठी नवस बोलण्यासाठी येथे मोठ्या प्रमाणावर भक्त येत असतात. तसेच ऑस्ट्रेलिया कॅनडा, ऑस्ट्रेलिया, अमेरिका, युरोप आदी देशात जाण्यासाठी व्हीसाची मागणी करतात. भक्तांचा या चमत्कारी हनुमानांवर एवढा विश्वास आहे की ते व्हीसासाठी दुसऱ्या देशांच्या दुतावासाच्या पायऱ्या झिजवण्याऐवजी या मंदिरात येणे पसंत करतात.