शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा झटका! महागाई भत्ता गोठवल्यानंतर, आता 'या' भत्त्याला लागू शकते कात्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2020 16:12 IST

केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना मिळणाऱ्या महागाई भत्त्यात करण्यात येणारी 4 टक्क्यांची वाढ सरकारने रोखली आहे. यामुळे सरकारची जवळपास 1,000 कोटी रुपयांची बचत होत आहे.

ठळक मुद्देकेंद्र सरकारने गेल्या गुरुवारी जवळपास 50 लाख कर्मचाऱ्यांचा महंगाई भत्ता गोठवलाकेंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना मिळणाऱ्या महागाई भत्त्यात करण्यात येणारी 4 टक्क्यांची वाढ सरकारने रोखली आहे. सरकारने महागाई भत्ता वाढवण्यासाठी 14,595 कोटी रुपयांचा अतिरिक्त खर्च निर्धारित केला होता.

नवी दिल्ली : केंद्र सरकारने गेल्या गुरुवारी जवळपास 50 लाख कर्मचाऱ्यांचा महंगाई भत्ता गोठवला. सरकारने घेतलेल्या या निर्णयाचा तब्बल 54 लाख सरकारी कर्मचारी आणि 65 लाख पेन्शनर्सवर परिणाम झाला आहे. यानंतर आता सरकार ट्रान्सपोर्ट अलाउंसमध्येही डिडक्शन करणार असल्याचा कयास लावला जात आहे. यासंदर्भात सोशल मिडियावरही जोरदार चर्चा  सुरू आहे.

एनबीटीने दिलेल्या एका वृत्तानुसार, तुर्तास या विषयावर कसल्याही प्रकारचा निर्णय झालेला नसल्याचे अर्थमंत्रालयातील एका मोठ्या अधिकाऱ्याने म्हटले आहे. तर, असे झाल्यास एकाच महिन्यात सरकारची जवळजवळ 3500 कोटी रुपयांची बचत होईल, असे इतर काही अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.  

किम जोंगनंतर बहीण नव्हे, 'हे' बनू शकतात उत्तर कोरियाचे हुकूमशहा; संपूर्ण जग म्हणतं 'जल्लाद'!

यामुळे कर्मचाऱ्यांचा विरोधही व्हायला नको - केंद्र सरकारचे कार्मचारी तथा प्रशिक्षण विभागातील (डीओपीटी) अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे, की ट्रान्सपोर्ट अलाउंसवर कात्री लागू शकते. ट्रान्सपोर्ट अलाउंस हा कर्मचाऱ्यांना घरून कार्यालयात आणि कार्यालयातून घरी जाण्यासाठी दिला जातो. लॉकडाउनमुळे गेल्या महिन्याच्या 25 तारखेपासून कर्मचाऱ्यांचे कार्यालयांत जाणे बंद आहे. यामुळे ते ट्रान्सपोर्ट अलाउंसवर दावा करू शकत नाहीत. त्यामुळे सरकारने एप्रिल महिन्याचा ट्रान्सपोर्ट अलाउंस दिला नाही, तरीही कर्मचाऱ्यांच्या विरोध व्हायला नको. 

काश्मीर ते पंजाबपर्यंत जवानांची कारवाई; सहा दहशतवाद्यांचा खात्मा, 29 लाख रुपयांसह एकाला पकडले

DA गोठवल्याने सरकारला 14,595 कोटींचा फायदा -केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना मिळणाऱ्या महागाई भत्त्यात करण्यात येणारी 4 टक्क्यांची वाढ सरकारने रोखली आहे. यामुळे सरकारची जवळपास 1,000 कोटी रुपयांची बचत होत आहे. सरकारने महागाई भत्ता वाढवण्यासाठी 14,595 कोटी रुपयांचा अतिरिक्त खर्च निर्धारित केला होता. कोरोना व्हायरसचा प्रसार थांबवण्यासाठी देशात सुरू असलेल्या लॉकडाउनमुळे देशाचे मोठे अर्थिक नुकसान झाले आहे.

टॅग्स :Employeeकर्मचारीGovernmentसरकारCentral Governmentकेंद्र सरकारNarendra Modiनरेंद्र मोदीcorona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारत