शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

दगडफेकीच्या घटनेनंतर भाजपच्या सचिवांना मिळाली 'झेड' सुरक्षा अन् 'बुलेट प्रूफ' गाडी

By मोरेश्वर येरम | Updated: December 14, 2020 14:24 IST

दगडफेकीच्या घटनेनंतर कैलास विजयवर्गीय यांच्या सुरक्षेत वाढ करुन त्यांना आता झेड दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. यासोबतच त्यांना आता बुलेट प्रूफ गाडी देखील देण्यात आलीय. 

ठळक मुद्देपश्चिम बंगालमध्ये जे.पी.नड्डा यांच्या ताफ्यावर दगडफेक झाली होतीकैलास विजयवर्गीय यांना झाली होती दुखापतविजयवर्गीय यांना आता झेड सुरक्षा

कोलकाताभारतीय जनता पक्षाचे (भाजप) सचिव कैलास विजयवर्गीय यांच्या सुरक्षेत वाढ कऱण्यात आली आहे. पश्चिम बंगाल दौऱ्यात भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या ताफ्यावर दगडफेकीची घटना घडली होती. विजयवर्गीय यांच्या गाडीवरही दगडफेक झाली होती. ज्यात विजयवर्गीय यांना दुखापत झाली होती. 

दगडफेकीच्या घटनेनंतर कैलास विजयवर्गीय यांच्या सुरक्षेत वाढ करुन त्यांना आता झेड दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. यासोबतच त्यांना आता बुलेट प्रूफ गाडी देखील देण्यात आलीय. 

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा गेल्या आठवड्यात पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर गेले होते. यावेळी नड्डा यांच्या ताफ्यावर अज्ञातांनी दगडफेक केली होती. यात नड्डा यांना कोणतीही दुखापत झाली नाही. पण कैलास विजयवर्गीय यांच्या गाडीवर झालेल्या दगडफेकीत विजयवर्गीय यांना दुखापत झाली. पश्चिम बंगालच्या निवडणुकीत भाजपची जबाबदारी कैलास विजयवर्गीय यांना देण्यात आली आहे. 

पश्चिम बंगालमध्ये पुढील वर्षी विधानसभा निवडणुक होणार आहे. या पार्श्वभूमीवर भाजपने पश्चिम बंगालमध्ये आपलं मजबूत स्थान निर्माण करण्यासाठी कंबर कसली आहे. दगडफेकीच्या घटनेनंतर भाजपकडून तृणमूल काँग्रेस आणि ममता बॅनर्जी सरकारवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. 

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही ममता सरकारवर जोरदार टीका केली. पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड यांनीही या घटनेचा सविस्तर अहवाल गृह मंत्रालयाला पाठवला आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजप विरुद्ध तृणमूल हे द्वंद्व पाहता अमित शहा देखील आता पश्चिम बंगालचा दौरा करणार आहेत. येत्या १९ आणि २० डिसेंबर रोजी अमित शहा पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर जाणार आहेत.

टॅग्स :west bengalपश्चिम बंगालBJPभाजपा