शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

अमेरिका दौऱ्यावरुन परतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे विमानतळावर भव्य स्वागत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2021 14:58 IST

PM Narendra Modi America visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अमेरिकेच्या तीन दिवसीय दौऱ्यावरुन परत आले. यावेळी ढोल-ताशांच्या गजरात त्यांचे स्वागत करण्यात आले.

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या तीन दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावरुन आज दिल्लीला परतले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वागत करण्यासाठी विमानतळाबाहेर मोठी गर्दी जमकली होती. ढोल-ताशांसह नरेंद्र मोदींचे विमानतळावर जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा म्हणाले की, अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन यांच्याशी पंतप्रधान मोदींची मैत्री नवीन नाही, त्यांचे जुने नाते आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनीही त्याचाच पुनरुच्चार केला.

स्वागतासाठी जय्यत तयारीपंतप्रधान नरेंद्र मोदी आज अमेरिकेच्या तीन दिवसीय दौऱ्यावरुन परत आले. यावेळी त्यांच्या स्वागतासाठी विमानतळाबाहेरही जय्यत तयारी करण्यात आली होती. लोक ढोल-ताशांच्या गजरात पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठी उभे होते. पंतप्रधान मोदी बुधवारी अमेरिकेच्या अधिकृत दौऱ्यावर वॉशिंग्टनला गेले होते, तर शुक्रवारी अध्यक्ष जो बिडेन यांच्याशी त्यांची पहिली भेट झाली. यासह, त्यांनी क्वाड ग्रुपच्या परिषदेतही भाग घेतला. आपल्या भेटीच्या शेवटच्या टप्प्यात त्यांनी संयुक्त राष्ट्राच्या महासभेच्या 76 व्या सत्रालाही संबोधित केलं.

अक्षय कुमारचा वर्दीतला फोटो पाहून नाराज झाले IPS अधिकारी, अक्षय म्हणाला...

भाषणात विविध मुद्द्यांवर भाष्यआपल्या भाषणात पंतप्रधान मोदींनी दहशतवाद, कोरोना, संयुक्त राष्ट्राची विश्वासार्हता यासह विविध मुद्द्यांचा उल्लेख केला. त्यांनी अफगाणिस्तानबद्दवरही भाष्य केलं. अफगाणिस्तानची माती दहशतवाद आणि दहशतवादी हल्ले पसरवण्यासाठी वापरली जाणार नाही, याची खात्री करण्याची गरज आहे, असे मोदी म्हणाले. 

कोरोना लसीकरणात निष्काळजीपणा, 6 कोटी नागरिकांनी अद्याप घेतला नाही दुसरा डोस

चीन आणि पाकिस्तानवरही निशाणापंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, जे देश दहशतवादाचा राजकीय साधन म्हणून वापर करत आहेत, त्यांना हे समजले पाहिजे की दहशतवाद त्यांच्यासाठी तितकाच मोठा धोका आहे. अफगाणिस्तानची माती दहशतवाद आणि दहशतवादी हल्ले पसरवण्यासाठी वापरली जात नाही याची खात्री करणे फार महत्वाचे आहे. आपण सावध असले पाहिजे की, कोणताही देश तिथल्या नाजूक परिस्थितीचा आपल्या स्वार्थासाठी साधन म्हणून वापर करण्याचा प्रयत्न करत नाही.

जादूटोण्याच्या संशयावरुन एकाच कुटुंबातील 3 जणांची हत्या, आरोपी अटकेत

मला देशाचा अभिमानमोदी पुढे म्हणाले, भारत सर्वात मोठी लोकशाही आहे.  भारताच्या लोकशाहीची ही ताकद आहे की, रेल्वे स्टेशनवर आपल्या वडिलांसोबत चहा विकणारा एक साधारण मुलगा आज भारताचा पंतप्रधान म्हणून चौथ्यांदा UNGA ला संबोधित करत आहे. मी या सर्वात मोठी लोकशाही असलेल्या देशाचे प्रतिनिधित्व करत असल्याचा मला अभिमान आहे, असंही ते म्हणाले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीdelhiदिल्लीAmericaअमेरिकाJoe Bidenज्यो बायडनJ P Naddaजगत प्रकाश नड्डाBJPभाजपा