शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

माकन, फुल्का यांचे राजीनाम्यांमुळे काँग्रेस-आप आघाडीच्या मार्गातील अडथळे दूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2019 15:33 IST

फुलका आणि माकन यांनी दिलेल्या राजीनाम्यामुळे आप आणि काँग्रेसमध्ये लोकसभा निवडणुकीसाठीच्या संभाव्य आघाडीच्या मार्गातील अडथळे दूर झाले आहेत

ठळक मुद्देएचएस फुलका आणि अजय माकन यांनी दिलेल्या राजीनाम्यामुळे आप आणि काँग्रेसमध्ये लोकसभा निवडणुकीसाठीच्या संभाव्य आघाडीच्या मार्गातील अडथळे दूरकाँग्रेस आणि आपमध्ये आघाडीच्या चर्चेला सुरुवात होण्याची शक्यता आगामी लोकसभा निवडणुकीत आप आणि काँग्रेस दिल्ली, हरियाणा आणि पंजाब या राज्यांत आघाडी करून निवडणूक लढवण्याची शक्यता

नवी दिल्ली -  गेल्या दोन दिवसांत दिल्लीच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडल्या असून, आपचे नेते एचएस फुलका यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देऊन एक दिवस उलटत नाही तोच  दिल्ली प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अजय माकन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. फुलका आणि माकन यांनी दिलेल्या राजीनाम्यामुळे आप आणि काँग्रेसमध्ये लोकसभा निवडणुकीसाठीच्या संभाव्य आघाडीच्या मार्गातील अडथळे दूर झाले आहेत. त्यामुळे या दोन्ही पक्षांकडून आगामी निवडणुकीसाठीच्या युतीच्या बोलणीला वेग येण्याची शक्यता आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि आपमध्ये होणाऱ्या संभाव्य युतीच्या मार्गात आप नेते एचएस फुलका आणि काँग्रेसचे दिल्ली अध्यक्ष अजय माकन यांच्याकडून अडथळे येत होते. दरम्यान, या दोघांच्याही राजीनाम्यामुळे दिल्लीच्या राजकारणात  नव्या समीकरणांचा उदय होण्याची शक्यता आहे.1984 साली दिल्लीत झालेल्या शीखविरोधी दंगलीमुळे फुलका हे आप आणि काँग्रेसमधील आघाडीला विरोध करत होते. तर आपण आपशी संघर्ष केला आहे. त्यामुळे आपण आपसोबत आघाडी कशी काय करू शकतो, असा प्रश्न माकन यांच्याकडून उपस्थित करण्यात येत होता. मात्र या दोन्ही नेत्यांनी राजीनामे दिल्याने आप आणि काँग्रेस यांच्यातील आघाडीचा मार्ग मोकळा झाला आहे. आता दोन्ही पक्षांमध्ये आघाडीच्या चर्चेला सुरुवात होऊ शकते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आपकडून संजय सिंह तर काँग्रेसकडून माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित या चर्चा करत आहेत. दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकीत आप आणि काँग्रेस दिल्ली, हरियाणा आणि पंजाब या राज्यांत आघाडी करून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे.  दरम्यान, दिल्ली प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी शीला दीक्षित, जे.पी. आग्रवाल आणी योगानंद शास्त्री यांची नावे चर्चेत आहेत.  

टॅग्स :Politicsराजकारणcongressकाँग्रेसAAPआपNew Delhiनवी दिल्ली