राहुल गांधीच्या आरोपांनंतर विरोधकाकडून मोदींवर निशाणा

By Admin | Updated: December 21, 2016 22:51 IST2016-12-21T22:51:21+5:302016-12-21T22:51:21+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2013 ते 2014 या काळात सहारा समुहाकडून नऊ वेळा पैसे घेतल्याचा सनसनाटी आरोप राहुल गांधींनी केल्यानंतर विरोधी पक्षांनी

After Rahul Gandhi's accusation, the opponent of Modi has a target on Modi | राहुल गांधीच्या आरोपांनंतर विरोधकाकडून मोदींवर निशाणा

राहुल गांधीच्या आरोपांनंतर विरोधकाकडून मोदींवर निशाणा

 ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. 21 - पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांनी 2013 ते 2014 या काळात सहारा समुहाकडून नऊ वेळा पैसे घेतल्याचा सनसनाटी आरोप राहुल गांधींनी केल्यानंतर विरोधी पक्षांनी नरेंद्र मोदींविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे.  काँग्रेसचे नेते रणदीप सुरजेवाला यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना आरोपांना बळकटी देणारी  आकडेवारी सादर केली. तर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह तृणमूल काँग्रेसचे नेते डेरेक ओब्रायन यांनी राहुल गांधी यांनी मोदींवर केलेल्या आरोपांची  चौकशी करण्याची मागणी केली आहे. 
राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदींवर केलेल्या सनसनाटी आरोपांनंतर भाजप नेते रविशंकर प्रसाद यांनी त्याला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला होता. गंगेसारख्या पवित्र असलेल्या पंतप्रधानांवर  राहुल गांधींनी आरोप केल्याचे प्रसाद म्हणाले होते. त्याला "गंगा तो मैली हो गई है" अशा शब्दात सुरजेवाला यांनी प्रत्युत्तर दिले. 

Web Title: After Rahul Gandhi's accusation, the opponent of Modi has a target on Modi