शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
2
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
3
फक्त आरोग्य विमा काढणे पुरेसे नाही? 'या' एका नियमामुळे तुमचा क्लेम रिजेक्ट होईल, खिशाला बसेल भुर्दंड
4
"टाटा समूहात जे सुरू आहे, ते पाहून..," रतन टाटांचे निकटवर्तीय नोशीर सूरावालांनी अखेर मौन सोडलं
5
पैसे कमावण्याची संधी? ५ मोठे आयपीओ बाजारात येणार; लेन्सकार्टसह 'या' कंपन्यांची लिस्टिंगची तयारी
6
खळबळजनक! सुसाट डिफेंडरची ५ वाहनांना जोरदार धडक; तिघांचा मृत्यू, ५ जण जखमी
7
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
8
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
9
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
10
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच
11
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
12
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, निफ्टी ७० अंकांच्या तेजीसह उघडला; मेटल-रियल्टी शेअर्समध्ये खरेदी
13
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
14
ऑफर्स, ऑनलाईन चॅट्स, फसवणुकीचं जाळं...; iPhone चं आमिष दाखवून लाखोंची फसवणूक
15
भयानक प्रकार! भाजप नेत्याने शेतकऱ्याला थारखाली चिरडले, वाचवायला आलेल्या मुलींचे कपडे फाडले
16
आधार कार्डापासून ते बॅंक अकाऊंट पर्यंत, १ नोव्हेंबरपासून बदलणार ‘हे’ ५ नियम; तुमच्या खिशावर थेट होणार परिणाम
17
आंतरराष्ट्रीय जुजित्सू खेळाडू रोहिणी कलम यांनी आयुष्य संपविले; एक फोन आला आणि ती खोलीत गेली...
18
८ मिनिटांत ८ अब्ज रुपयांचे दागिने चोरणारे चोर सापडले; पॅरिसच्या म्युझियममध्ये टाकलेला दरोडा
19
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
20
टॅरिफची धमकी मिळाल्याने थायलंड-कंबोडियात युद्धबंदी; ट्रम्प यांच्या आणखी एका मध्यस्थीला मिळाले यश

Congress change Twitter DP: पंतप्रधान मोदींनंतर, आता काँग्रेसनंही बदलला ट्विटरचा प्रोफाईल फोटो, लिहिला हा खास मेसेज

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2022 14:54 IST

काँग्रेसने तिरंग्यासह असलेले माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा फोटो लावला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर, आता काँग्रेसनेही आपल्या सोशल मीडिया हँडलवरील प्रोफाईल फोटो बदलला आहे. काँग्रेसने तिरंग्यासह असलेले माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू (Pandit Jawaharlal Nehru) यांचा फोटो लावला आहे. स्वातंत्र्य दिनापूर्वी काँग्रेसने 'हर घर तिरंगा' मोहिमेंतर्गत प्रोफाईल फोटो बदलला आहे. याच बरोबर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) तसेच प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांनीही, आपल्या प्रोफाईल फोटोमध्ये पंडित नेहरूंचा तिरंग्यासोबतचा फोटो लावला आहे.

काँग्रेसने पंडित नेहरूंच्या फोटोसोबत शेअर केला खास मेसेज -तिरंग्यासोबतचा पंडित जवाहरलाल नेहरु यांचा फोटो शेअर करत काँग्रेसने लिहिले आहे, "तिरंगा आमच्या हृदयात आहे, रक्ताच्या स्वरुपात आमच्या नसानसात आहे. 31 डिसेंबर, 1929 रोजी पंडित नेहरू यांनी रावी नदीच्या किनाऱ्यावर तिरंगा फडकवताना म्हटले होते, की 'आता तिरंगा फडकावला आहे. हा झुकायला नको.' चला आपण सर्व जण देशाच्या अखंड एकतेचा संदेश देणाऱ्या या तिरंग्याला आपली ओळख बनवू या. जय हिंद. #MyTirangaMyPride"

राहुल आणि प्रियंका गांधींनीही शेअर केला फोटो -माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा फोटो शेअर करताना राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी लिहिले, 'देशाची शान आहे, आपला तिरंगा. प्रत्येक हिंदुस्तानी व्यक्तीच्या हृदयात आहे, आपला तिरंगा.' तसेच, प्रियांका गांधी(Priyanka Gandhi) यांनी, 'विजयी विश्व तिरंगा प्यारा, झंडा ऊंचा रहे हमारा,' असे लिहिले आहे.

पंतप्रधान मोदींनी केलं होतं प्रोफाईलवर तिरंगा लावण्याचं आवाहन - पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी रविवारी आपल्या 'मन की बात'च्या 91व्या अॅपिसोडमध्ये देशवासीयांना 2 ऑगस्टपासून 15 ऑगस्टदरम्यान आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर तिरंगा ध्वज प्रोफाईल फोटो म्हणून ठेवण्याचे आवाहन केले होते. एवढेच नाही, तर 'स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव' जन आंदोलनात परिवर्तित होत आहे, असेही पीएम मोदी यांनी म्हटले होते.

टॅग्स :congressकाँग्रेसIndependence Dayस्वातंत्र्य दिनRahul Gandhiराहुल गांधीPriyanka Gandhiप्रियंका गांधी