शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

'ऑपरेशन सिंदूर'नंतर दहशतवादी पुन्हा घुसखोरी करण्याच्या तयारीत, पत्रकार परिषदेत बीएसएफकडून मोठा खुलासा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2025 15:35 IST

ऑपरेशन सिंदूरमध्ये शत्रू सैन्याच्या चौक्या कशा उद्ध्वस्त केल्या आणि त्यांचे मनसुबे कसे हाणून पाडले, याची माहिती बीएसएफ अधिकाऱ्यांनी दिली.

ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय सीमा सुरक्षा दलाने मंगळवारी जम्मू आणि काश्मीरमध्ये पत्रकार परिषद घेतली. ऑपरेशन सिंदूरमध्ये शत्रू सैन्याच्या चौक्या कशा उद्ध्वस्त केल्या आणि त्यांचे मनसुबे कसे हाणून पाडले, याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. तसेच, येत्या काळातील दहशतवाद आणि दहशतवादी हल्ले यावर भारतीय सैन्याची तयारी कशी आहे, यावर देखील भाष्य केलं. "ऑपरेशन सिंदूर अजूनही सुरू आहे. कारण आपण पाकिस्तानवर विश्वास ठेवू शकत नाही", असे जम्मू फ्रंटियरचे बीएसएफ महानिरीक्षक शशांक आनंद यावेळी म्हणाले.

'ऑपरेशन सिंदूर'नंतर सीमा सुरक्षा दलाने आंतरराष्ट्रीय सीमेवरील सुरक्षेत कोणतीही कसर सोडलेली नाही. या सीमांवरून दहशतवाद्यांची घुसखोरी होण्याची भीती असून, सीमा सुरक्षा दल त्यासाठी हाय अलर्टवर असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. 

पाकिस्तानवर विश्वास ठेवू शकत नाही!या पत्रकार परिषदेत बोलताना आयजी म्हणाले की, "पाकिस्तानवर विश्वास ठेवू शकत नाही, म्हणून ऑपरेशन सिंदूर अजूनही चालू आहे. आंतरराष्ट्रीय सीमेवर बीएसएफ पूर्णपणे सज्ज आणि सतर्क आहे. सहाय्यक कमांडंर नेहा भंडारी यांच्यासह बीएसएफ महिला कर्मचाऱ्यांनी महत्त्वाच्या चौक्यांवर तैनात होऊन अनुकरणीय धैर्य दाखवले आहे. ऑपरेशन सिंदूरनंतरही सीमेवरून घुसखोरी होण्याची शक्यता असल्याची माहिती आम्हाला मिळाली आहे. मात्र, या सगळ्यांना रोखण्यासाठी आम्ही सज्ज आहोत."

सियालकोट सेक्टरमध्ये पाकिस्तानी सैन्याच्या गोळीबाराच्या आडून सीमा ओलांडण्याचा प्रयत्न करणाऱ्या संशयित दहशतवाद्यांच्या घुसखोरीचा मोठा प्रयत्न बीएसएफने यशस्वीरित्या उधळून लावला, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. 'ऑपरेशन सिंदूर' दरम्यान भारताच्या हल्ल्यांपुढे पाकिस्तानला गुडघे ठेकावे लागले. या दरम्यान दहशतवादी तळे नाहीशी झालीच, पण पाकिस्तानलाही मोठे नुकसान आले. शत्रूने माघार घेतली असली, तरी सीमेपलीकडून गोळीबार आणि त्या आड घुसखोरीचे प्रयत्न सुरू असल्याचे, त्यांनी यावेळी सांगितले.

टॅग्स :BSFसीमा सुरक्षा दलOperation Sindoorऑपरेशन सिंदूरIndia vs Pakistanभारत विरुद्ध पाकिस्तान