शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी लेफ्टनंट कर्नल प्रसाद श्रीकांत पुरोहित नऊ वर्षांनी आले तुरुंगाबाहेर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2017 11:37 IST

कारागृहात जामिनाची सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर बुधवारी सकाळी ते तळाजो तुरुंगाबाहेर आले. सुटकेच्यावेळी पुरोहितांसोबत त्यांचे कुटुंबिय आणि लष्कराचे जवान देखील होते.  

ठळक मुद्दे न्यायालयाने दिलेल्या जामिनाच्या मूळ आदेशात मंगळवारी सकाळी तातडीने बदल करून घेतल्याने या आरोपीची तुरुंगातून लवकर सुटका होणे सुलभ झाले.कर्नल पुरोहित यांचा एक लाख रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलका व तेवढ्याच रकमेचे दोन जामीन, अशा अटीवर सुटकेचा मूळ आदेश झाला होता.

ठाणे, दि. 23 - मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी लेफ्टनंट कर्नल प्रसाद श्रीकांत पुरोहित यांची अखेर नऊ वर्षांनी तुरुंगातून सुटका झाली आहे. कारागृहात जामिनाची सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर बुधवारी सकाळी पुरोहित तळाजोतुरुंगाबाहेर आले. सुटकेच्यावेळी पुरोहितांसोबत त्याचे कुटुंबिय आणि लष्कराचे जवान देखील होते.  त्यांच्या वाहनाचा ताफा मुंबईच्या दिशेने रवाना झाला असून, मुंबईत एऩआयए कोर्टात काही आवश्यक बाबींची पूर्तता केल्यानंतर ते पुण्याला रवाना होतील अशी प्राथमिक माहिती आहे. 

दोन दिवसांपूर्वीच सोमवारी कर्नल पुरोहित यांना सर्वोच्च न्यायालयाने जामिन मंजूर केला होता. पण काही तांत्रिक प्रक्रियांमुळे त्यांच्या सुटकेला दोन दिवस लागले. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करत विशेष एनआयए (राष्ट्रीय तपास पथक) न्यायालयाने मंगळवारी संध्याकाळी उशिरा मालेगाव २००८ बॉम्बस्फोटातील आरोपी लेफ्टनंट कर्नल प्रसाद श्रीकांत पुरोहित यांच्या सुटकेचा आदेश दिला होता. 

महाराष्ट्राच्या नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथे 29 सप्टेंबर 2008 रोजी झालेल्या बॉम्बस्फोटात 7 जणांचा मृत्यू झाला होता. पुरोहित यांच्या जामिनासाठी प्रसिद्ध वकिल हरीश साळवे यांनी सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडली होती. राष्ट्रीय तपास यंत्रणा एनआयएने मात्र जामिनाला विरोध केला होता. पुरोहित यांच्या विरोधात सबळ पुरावे असल्याने मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवावा असे एनआयएचे म्हणणे होते. न्यायाच्या दृष्टीकोनातून पुरोहित यांना जामिन मंजूर केला पाहिजे असा युक्तीवाद हरीश साळवे यांनी केला होता. मालेगाव प्रकरणात आरोपी प्रज्ञा सिंह ठाकूरला जामिन मिळतो मग पुरोहितला का नाही ? असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता. एनआयएची भूमिका दुटप्पी असल्याचा आरोप साळवे यांनी केला होता. साक्षीदारांच्या साक्षीवरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. 

नाशिक जिल्ह्याच्या मालेगाव शहरात झालेल्या या स्फोटप्रकरणी एनआयएने एकूण १४ जणांना आरोपी बनवले होते. यात पुरोहित यांचाही समावेश होता. बाइकवरील दोन बॉम्बच्या स्फोटांत सात जण ठार झाले होते. महाराष्ट्र दहशवाद विरोधी पथकाचे प्रमुख हेमंत करकरे यांच्या नेतृत्वाखाली सुरुवातीला तपास झाला होता. नंतर हा तपास एनआयएकडे देण्यात आला. पुरोहित आणि प्रज्ञा ठाकूरशिवाय शिवनारायण कालसांगरा, श्याम साहू, रमेश उपाध्याय, समीर कुलकर्णी, अजय, राकेश धावडे, जगदीश म्हात्रे, सुधाकर द्विवेदी, सुधाकर चतुर्वेदी आणि प्रवीण तकालकी यांनाही अटक झाली होती. एनआयएने साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर व पुरोहित यांच्यावर लावण्यात आलेला मकोका हटवण्यासंदर्भात कायदा मंत्रालय आणि अ‍ॅटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांच्याकडून मत मागितले होते.केंद्रात व राज्यात सत्तापालट झाल्यानंतर राष्ट्रीय तपास यंत्रणेची मालेगाव स्फोटातील आरोपींबाबतची भूमिका सौम्य झाल्याचा आरोप करण्यात आला होता.

आदेशात बदल केल्याने लगेच सुटणे शक्य झालेले. कर्नल पुरोहित यांच्या वकिलाने सोमवारी न्यायालयाने दिलेल्या जामिनाच्या मूळ आदेशात मंगळवारी सकाळी तातडीने बदल करून घेतल्याने या आरोपीची तुरुंगातून लवकर सुटका होणे सुलभ झाले. कर्नल पुरोहित यांचा एक लाख रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलका व तेवढ्याच रकमेचे दोन जामीन, अशा अटीवर सुटकेचा मूळ आदेश झाला होता.अ‍ॅड. नीला गोखले यांनी पुन्हा त्याच खंडपीठाकडे जाऊन या आदेशात बदल करून घेतला. त्यानुसार दोन जामिनांच्या ऐवजी प्रत्येकी एक लाखाचे दोन रोख जामीन, असा बदल केला गेला. परिणामी जामिनांची रोख रक्कम भरून कर्नल पुरोहित लगेच बाहेर येऊ शकले. रोख जामिनांच्या बदल्यात रीतसर जामीन देण्याची कायदेशीर प्रक्रिया पुढील १५ दिवसांत पूर्ण केली जाईल.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय