शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

नरेंद्र मोदींच्या निवृत्तीनंतर मीही राजकारण सोडेन - स्मृती इराणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2019 03:25 IST

मी जेव्हा राजकारणात आले तेव्हा माझ्यावर विश्वास ठेऊन मला संधी देणारे हे केवळ नरेंद्र मोदी होते, त्यामुळे जेव्हा ते सक्रीय राजकारणामधून निवृत्त होतील तेव्हा मी देखील राजकारण सोडेन.

पुणे  - मी जेव्हा राजकारणात आले तेव्हा माझ्यावर विश्वास ठेऊन मला संधी देणारे हे केवळ नरेंद्र मोदी होते, त्यामुळे जेव्हा ते सक्रीय राजकारणामधून निवृत्त होतील तेव्हा मी देखील राजकारण सोडेन, असे प्रतिपादन केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांनी केले.‘वर्डस काउंट’ या शब्दोत्सवाच्या समारोप सत्रात त्या बोलत होत्या. उद्योजक अतुल चोरडिया, सागर चोरडिया, महोत्सवाच्या आयोजक वर्षा चोरडिया, सबिना संघवी आणि ‘वडर््स काउंट’ या संकल्पनेच्याप्रणेत्या अद्वैता कला हे देखील यावेळी उपस्थित होते. यावेळी ‘स्क्रिप्टिंग हर स्टोरी-फ्रॉम स्टार टू स्टार कॅम्पेनर’ या विषयावर अद्वैता कला यांनी स्मृती इराणी यांची मुलाखत घेतली. यावेळी स्मृती इराणी म्हणाल्या की, आमचे सरकार हे विकासाच्या मुद्द्यावर तर संघटन हे राजकारणावर सुरू असून एक राजकीय पक्ष म्हणून आम्हाला राजकारण करावेच लागते. मात्र, विकासाचा मुद्दा हा आमच्या सरकारसाठी नक्कीच महत्त्वाचा आहे.नरेंद्र मोदी यांच्यानंतर कोण? असा प्रश्न विचारला असता तो ठरविण्याचा अधिकार हा जनतेला आहे. आज विविध माध्यमांचा सर्वत्र प्रभाव आहे. मात्र काही दशकांपूर्वी जेव्हा हा प्रभाव नव्हता, तेव्हा सुमित्रा महाजन आणि सुषमा स्वराज यांसारख्या महिला नेत्यांनी आपला राजकारणातील प्रवास सुरू केला होता. तो काल आजच्या काळापेक्षा नक्कीच कठीण होत, त्यामुळे या दोघीही माझ्यासाठी प्रेरणा आहेत, असेही इराणी यांनी यावेळी नमूद केले.अमेठीतून लढणार का?यंदादेखील अमेठीमधून निवडणूक लढवणार का? या प्रश्नाला उत्तर देताना त्या म्हणाल्या, की २०१४ मध्ये कोण स्मृती इराणी हा प्रश्न अनेकांनी केला. मात्र, आता २०१९ मध्ये सगळ्यांना ‘स्मृती इराणी कोण आहेत’ हे माहिती आहे. परंतु मी अमेठीतून निवडणूक लढविणार की नाही, याचा निर्णय पक्षाध्यक्ष अमित शहा हेच घेतील.

टॅग्स :Smriti Iraniस्मृती इराणीPoliticsराजकारणNarendra Modiनरेंद्र मोदी