पतधोरणानंतर सेन्सेक्स 185 अंकांनी उंचावला

By Admin | Updated: August 6, 2014 02:12 IST2014-08-06T02:12:59+5:302014-08-06T02:12:59+5:30

दिवसभर वर- खाली हेलखावे खाल्ल्यानंतर मागणीचे पाठबळ मिळाल्याने शेअर बाजारात मंगळवारी सलग तिस:या सत्रतही तेजी कायम राहिली.

After the monetary policy, the Sensex recovered by 185 points | पतधोरणानंतर सेन्सेक्स 185 अंकांनी उंचावला

पतधोरणानंतर सेन्सेक्स 185 अंकांनी उंचावला

मुंबई : दिवसभर वर- खाली हेलखावे खाल्ल्यानंतर मागणीचे पाठबळ मिळाल्याने शेअर बाजारात मंगळवारी सलग तिस:या सत्रतही तेजी कायम राहिली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स शेवटच्या 9क् मिनिटांतच 185 अंकांच्या उसळीसह बंद झाला.
बाजारातील जाणकारांच्या मते, आरबीआयच्या द्वैमासिक आढाव्यात बँकांकडे कर्ज देण्याएवढी रोकड प्रवाहवाढीसाठी उपाययोजना करण्यात आली आहे. याचा बाजार धारणोवर अनुकूल परिणाम झाला. आरबीआयने सलग तिस:या पतधोरणात प्रमुख व्याजदरांत कोणताही बदल केला नाही.
सेन्सेक्स सकाळी तेजीसह उघडला. मात्र, दिवसभरात तो 25,562.36 अंकांर्पयत घसरला आणि अखेरीस 184,85 अंकांच्या वाढीसह बंद झाला. दोन सत्रंदरम्यान सेन्सेक्स 427.17 अंकांनी मजबूत झाला. एमअॅण्डएम, ओएनजीसी, टाटा मोटर्स आणि एचडीएफसी यांच्या नेतृत्वात सेन्सेक्समध्ये सुधारणा झाली. तिकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 62.9क् अंकांनी उंचावून 7746.55 अंकावर बंद झाला. दिवसभरात तो 7752.45 आणि 7638.क्5 अंकांदरम्यान राहिला. रिझव्र्ह बँकेचे पतधोरण बाजारासाठी सकारात्मक राहिले. एसएलआरमधील कपातीमुळे पर्याप्त रोकड उपलब्ध होईल, असा विश्वास वेल्थरेज सिक्युरिटीजचे सीईओ किरण कुमार कविकोंडाला यांनी व्यक्त केला. (प्रतिनिधी) 

 

Web Title: After the monetary policy, the Sensex recovered by 185 points

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.