शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

मोदींच्या 'त्या' वक्तव्यानंतर किरेन रिजिजूंनी शेअर केला शुर्पणखेचा व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2018 15:20 IST

पंतप्रधान मोदींनी आज सभागृहात पुन्हा एकदा 'रामायण' मालिकेची आठवण करून दिली.

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी राज्यसभेत रेणुका चौधरी यांच्यासंदर्भात केलेल्या वक्तव्यानंतर केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी 'रामायण' मालिकेतील शुर्पणखेचा व्हिडिओ ट्विटरवरून शेअर केला होता. यामध्ये शुर्पणखा जोरजोरात हसताना दिसत आहे. त्यानंतर लक्ष्मण तिचे नाक कापतो, असेही व्हिडिओत दाखवण्यात आले आहे. हा व्हिडिओ शेअर करत रिजिजू यांनी म्हटले होते की, पंतप्रधान मोदींनी आज सभागृहात पुन्हा एकदा 'रामायण' मालिकेची आठवण करून दिली. त्यामुळे भाजपा आणि काँग्रेसमधील वाद आणखीनच चिघळण्याची शक्यता आहे. रेणुका चौधरी यांनीदेखील या व्हिडीओवर आक्षेप घेतला असून आपण याविरोधात हक्कभंग आणणार असल्याचे रेणुका चौधरी यांनी सांगितले. निवडणुकीच्या मैदानात विरोधकांचे दात त्यांच्याच घशात घालण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कौशल्याबद्दल कोणालाच शंका नाही. मात्र, मोदींनी बुधवारी राज्यसभेत आपल्या हजरजबाबी वृत्तीने काँग्रेस खासदार रेणुका चौधरी यांना सणसणीत प्रत्युत्तर दिले. या प्रसंगाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. पंतप्रधान मोदी बुधवारी राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभारदर्शक ठरावावरील चर्चेत बोलत होते. यावेळी मोदींच्या एका विधानावर काँग्रेस खासदार रेणुका चौधरी जोरजोरात हसायला लागल्या. त्यावेळी सभापती व्यंकय्या नायडू यांनी नाराजी व्यक्त करत रेणुका चौधरी यांना कारवाई करण्याचा इशारा दिला.

मात्र, मोदींनी यावेळी कमलीचा हजरजबाबीपणा दाखवत रेणुका चौधरी यांना सणसणीत टोला लगावला. त्यांनी सभापती व्यंकय्या नायडू यांना रेणुका चौधरी यांना काही म्हणून नका, असे म्हटले. कारण रामायण मालिका संपल्यानंतर आज पहिल्यांदाच असं हसू ऐकायला मिळालं, असे सांगत मोदींनी चौधरींच्या हसण्याची तुलना राक्षसी हास्याशी केली. यानंतर सभागृहात मोठा हशा पिकला. रेणुका चौधरी यांनी काही म्हणण्याचा प्रयत्न केला पण सभागृहात एकच हास्यकल्लोळ उडाल्यानंतर त्यांना शांत बसावे लागले.

दुसरीकडे मोदींनी रेणुका चौधरी यांच्यावर केलेल्या टिप्पणीमुळे नवा वाद निर्माण झाला आहे. पंतप्रधान मोदींनी असे वक्तव्य करून स्त्रियांचा अपमान केला आहे, असा आरोप विरोधकांनी केला आहे. तर रेणुका चौधरी यांनी मोदी यांनी त्यांचे संस्कार दाखवून दिल्याचे म्हटले. मी पंतप्रधानांइतक्या खालच्या पातळीला जाऊ इच्छित नाही. मात्र, यानिमित्ताने पंतप्रधान मोदी यांची मानसिकता दिसून आल्याचे रेणुका चौधरी यांनी सांगितले होते. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीramayanरामायणcongressकाँग्रेस