मोदींच्या शपथग्रहणानंतर अकोल्यात जल्लोष कार्यकर्त्यांनी केली आतषबाजी; मिठाईचे वाटप

By Admin | Updated: May 26, 2014 21:28 IST2014-05-26T21:28:18+5:302014-05-26T21:28:18+5:30

अकोला : नरेंद्र मोदी यांनी सोमवारी दिल्लीत पंतप्रधानपदाची शपथ ग्रहण केल्यानंतर सायंकाळी अकोल्यात भाजपच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. आतषबाजी करून आणि मिठाई वाटून आनंद साजरा करण्यात आला.

After Modi's oath taking, Akhilesh celebrated the funeral of the party workers; Allocation of sweets | मोदींच्या शपथग्रहणानंतर अकोल्यात जल्लोष कार्यकर्त्यांनी केली आतषबाजी; मिठाईचे वाटप

मोदींच्या शपथग्रहणानंतर अकोल्यात जल्लोष कार्यकर्त्यांनी केली आतषबाजी; मिठाईचे वाटप

ोला : नरेंद्र मोदी यांनी सोमवारी दिल्लीत पंतप्रधानपदाची शपथ ग्रहण केल्यानंतर सायंकाळी अकोल्यात भाजपच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. आतषबाजी करून आणि मिठाई वाटून आनंद साजरा करण्यात आला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील सहकार्‍यांनी सोमवारी राष्ट्रपती भवनात आयोजित कार्यक्रमात शपथ ग्रहण केली. त्यासोबतच केंद्रात भाजप आणि मित्र पक्ष सत्तारूढ झाले. या क्षणाचा आनंद भाजप कार्यकर्त्यांनी अकोल्यातही साजरा केला. गांधी रोडवरील भाजप कार्यालयापुढे आतषबाजी करून कार्यकर्त्यांनी मोदींचा जयघोष केला.
.............
१२५ किलो लाडूचे वाटप
नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर अकोला शहरात नगरसेविका उज्ज्वला देशमुख यांनी शिवाजी पार्क परिसरात १२५ किलो लाडूचे वाटप केले.
............
फुंडकर, धोत्रे, पाटील झाले शपथग्रहणाचे साक्षीदार
भाजपने केंद्रात सत्ता मिळविल्यानंतर सोमवारी झालेल्या शपथग्रहण सोहळ्याचे साक्षीदार होण्याचा बहुमान खासदार संजय धोत्रे यांच्यासह केंद्रीय कार्यकारिणीचे सदस्य भाऊसाहेब फुंडकर आणि भाजपचे प्रदेश महासचिव आमदार रणजीत पाटील यांना मिळाला. दिल्लीतील पदग्रहण सोहळ्याला खासदारांसोबत भाऊसाहेब फुंडकर आणि आमदार पाटील यांना खास निमंत्रण होते.
............
फोटो :

Web Title: After Modi's oath taking, Akhilesh celebrated the funeral of the party workers; Allocation of sweets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.