मोदींनंतर गुजरातचे मुख्यमंत्री कोण?

By Admin | Updated: May 14, 2014 04:08 IST2014-05-14T04:08:42+5:302014-05-14T04:08:42+5:30

मतदानोत्तर जनमत चाचण्यांच्या (एक्झिट पोल) अनुकूल निकालामुळे उत्साह संचारलेल्या भाजपा नेत्यांनी आता बैठका, भेटीगाठी अशा डावपेचात्मक अंगाने जोमाने कामाला सुरुवात केली आहे़

After Modi, who is the Chief Minister of Gujarat? | मोदींनंतर गुजरातचे मुख्यमंत्री कोण?

मोदींनंतर गुजरातचे मुख्यमंत्री कोण?

अहमदाबाद : मतदानोत्तर जनमत चाचण्यांच्या (एक्झिट पोल) अनुकूल निकालामुळे उत्साह संचारलेल्या भाजपा नेत्यांनी आता बैठका, भेटीगाठी अशा डावपेचात्मक अंगाने जोमाने कामाला सुरुवात केली आहे़ यातूनच नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यास गुजरातचे मुख्यमंत्री कोण? यावर भाजपात खलबते सुरू झाल्याची चर्चा आहे़ भाजपा नेते मात्र तूर्तास या मुद्यावर मौन बाळगून आहेत़ पक्ष सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गुजरातेत मंगळवारी भाजपा कोअर ग्रुपची बैठक झाली़ गुजरातचे भाजपाध्यक्ष आऱसी़ फालदू यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीत, मोदींच्या उत्तराधिकार्‍याच्या मुद्यावर चर्चा झाल्याचे समजते़ या बैठकीनंतर फालदू दिल्लीला रवाना झाले़ कोअर ग्रुपच्या बैठकीनंतर गांधीनगर येथे भाजपा विधिमंडळ पक्ष आणि राज्यात पक्षाच्या प्रमुख पदाधिकार्‍यांची बैठक नियोजित आहे़ या बैठकीला नरेंद्र मोदी हेही उपस्थित राहणार आहेत़ या बैठकांबाबत सध्या तरी कुणीही बोलायला तयार नाही़ सर्व बैठका नियमित कामकाजाचा भाग असून, १६ मेनंतरच नव्या मुख्यमंत्र्यांबाबत निर्णय घेतला जाईल, असे भाजपा नेते विजय रूपानी यांनी सांगितले़

Web Title: After Modi, who is the Chief Minister of Gujarat?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.