शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

#MeToo नंतर आता #ManToo; पुरुष फोडणार लैंगिक अत्याचारांना वाचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2018 09:20 IST

15 जणांच्या गटाकडून मॅनटू मोहिमेला सुरुवात

बंगळुरु: सोशल मीडियावर अनेक महिला सध्या मीटू मोहिमेच्या अंतर्गत त्यांच्यावर झालेल्या लैंगिक अत्याचाराला वाचा फोडत आहेत. याच पार्श्वभूमीवर आता पुरुषांनी मॅनटू (#ManToo) अभियानाची सुरुवात केली आहे. 15 जणांच्या एका गटानं या आंदोलनाचा श्रीगणेशा केला आहे. यामध्ये फ्रान्सच्या एका माजी राजनैतिक अधिकाऱ्याचादेखील समावेश आहे. पुरुषांवर झालेल्या अत्याचारांना वाचा फोडण्यासाठी हे अभियान सुरू करण्यात आलं आहे. चिल्ड्रन्स राईट्स इनिशिएटिव्ह फॉर शेयर्ड पॅरेंटिंग (क्रिस्प) नावाच्या एनजीओनं मॅनटूची सुरुवात केली आहे. लैंगिक कायदे तटस्थ असावेत, यासाठी 15 जणांचा गट लढा देईल, असं क्रिस्पचे राष्ट्रीय अध्यक्ष कुमार व्ही. यांनी सांगितलं. #MeToo अभियानाच्या अंतर्गत खोट्या तक्रारी दाखल करणाऱ्यांना शिक्षा व्हायला हवी. कारण खोटे आरोप करणं म्हणजे आंदोलनाचा गैरवापर आहे. कोणालाही जाणूनबुजून अडकवण्यासाठी मीटूचा वापर होऊ नये, असं ते म्हणाले. मॅनटू अभियानाच्या अंतर्गत पुरुष त्यांच्यावर झालेल्या लैंगिक अत्याचाराविरोधात आवाज उठवतील, असं कुमार व्ही यांनी म्हटलं. 'मीटू मोहिमेच्या माध्यमातून महिला काही वर्ष किंवा दशकभराआधी झालेल्या लैंगिक अत्याचाराला वाचा फोडत आहेत. मात्र मॅनटूच्या अंतर्गत नुकत्याच घडून गेलेल्या घटनांविरोधात आवाज उठवला जाईल,' असंदेखील ते पुढे म्हणाले. यावेळी त्यांनी मीटू आंदोलनाच्या माध्यमातून पुढे आलेल्या प्रकरणांवरदेखील भाष्य केलं. लैंगिक अत्याचाराच्या तक्रारी खऱ्या असतील, तर महिलांनी सोशल मीडियावर येण्याऐवजी थेट कायदेशीर कारवाई करावी, असं कुमार व्ही यांनी म्हटलं.  

टॅग्स :Metoo Campaignमीटूsexual harassmentलैंगिक छळSexual abuseलैंगिक शोषण