शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

हरयाणात नोकरी सोडून खेळाडूंनी घेतली राजकारणात उडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2019 02:14 IST

आंतरराष्ट्रीय पातळीवर नाव कमावलेले हरयाणातील खेळाडू आता सरकारी नोकरीचा त्याग करुन राजकारणात नवी इनिंग सुरु करण्याच्या तयारीत आहेत.

चंदीगड : आंतरराष्ट्रीय पातळीवर नाव कमावलेले हरयाणातील खेळाडू आता सरकारी नोकरीचा त्याग करुन राजकारणात नवी इनिंग सुरु करण्याच्या तयारीत आहेत. बहुतांश खेळाडूंनी त्यासाठी भाजपकडे धाव घेतली आहे. राजकारणातील अन्य लोकांच्या तुलनेत या खेळाडूंच्या आयुष्यातील पुस्तकाची पाने अद्याप कोरे आहेत. अशावेळी भाजप जर त्यांना मैदानात उतरवित असेल तर त्यांच्याबाबत कोणाच्याही मनात शंका येण्याचे कारण नाही.भाजपमध्ये दाखल झालेल्या पदक विजेता योगेश्वर दत्त यांनी पोलीसमधील नोकरी सोडली आहे. डीएसपीच्या पदाचा राजीनामा देऊन ते राजकारणात नशिब आजमविणार आहेत. त्यांना सोनिपतच्या गोहाना विधानसभा मतदारसंघातून भाजपचे तिकिट मिळू शकते. गोहाना या जागेवर दीर्घ काळापासून काँग्रेसचा कब्जा आहे. त्यामुळे भाजप येथे स्टार उमेदवाराच्या शोधात होते.हॉकी खेळाडू संदीप सिंह हेही डीएसपीची नोकरी सोडून भाजपमध्ये दाखल झाले आहेत. भाजप त्यांना कैथल जिल्ह्यातून पेहोवा मतदारसंघातून मैदानात उतरवू शकते. या मतदारसंघातून भाजपला कधीच यश मिळालेले नाही. येथे बहुतांश वेळा इंडियन नॅशनल लोकदल अथवा काँग्रेसचे उमेदवार जिंकत आलेले आहेत. भाजपच्या ‘इस बार ७५ पार’या घोषणेत संदीप सिंह फिट बसताना दिसत आहेत.विजेंद्र यांनी लढविली आहे निवडणूकआॅलम्पिक मेडलिस्ट विजेंद्र सिंह यांनी या सर्व खेळाडूंपूर्वीच राजकारणात येण्याचे ठरविले होते. तेही हरियाणा पोलीसमध्ये डीएसपी होते आणि राजीनामा देऊन राजकारणात आले होते. ते हरियाणाच्या भिवानी जिल्ह्यातील आहेत. पण, काँग्रेसने त्यांना लोकसभा निवडणुकीत दिल्लीतून तिकीट दिले होते. मोदी लाटेत विजेंद्र निवडणुकीत पराभूत झाले.आंतरराष्ट्रीय पहिलवान बबिता फोगाट यापूर्वीच भाजपमध्ये दाखल झाल्या आहेत. त्यांनीही पोलीसमधील उप निरीक्षक पदाचा राजीनामा दिला आहे. बबिता यांना दादरी जिल्ह्यातील बाढडा मतदारसंघातून भाजप उमेदवारी देऊ शकतो. यापूर्वी पॅरालंपिक पदक विजेतती दीपा मलिक राजकारणात दाखल झाली आहे.लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये दाखल झालेली दीपा रोहतक निवडणूक लढणार असल्याची चर्चा होती. पण, ऐनवेळी भाजपने दीपा यांच्याऐवजी माजी संसद सदस्य अरविंद शर्मा यांना उमेदवारी दिली आणि ते जिंकूनही आले. भाजप आता त्यांना तिकीट देऊ शकते.

टॅग्स :HaryanaहरयाणाBJPभाजपा