पत्नीसह ३ सावत्र मुलींचा खून करून 'त्याने' मृतदेहांसह घरात काढले २ दिवस

By Admin | Updated: June 25, 2016 13:51 IST2016-06-25T13:51:42+5:302016-06-25T13:51:44+5:30

एका ३५ वर्षीय इसमाने आपल्या पत्नीसह तीन मुलींची हत्या करून त्यांच्या मृतदेहांसह दोन दिवस घरातच काढल्याची धक्कादायक घटना चेन्नईमध्ये घडली आहे.

After killing his three step daughters with his wife, he 'took' two days in the house with the bodies | पत्नीसह ३ सावत्र मुलींचा खून करून 'त्याने' मृतदेहांसह घरात काढले २ दिवस

पत्नीसह ३ सावत्र मुलींचा खून करून 'त्याने' मृतदेहांसह घरात काढले २ दिवस

style="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत
चेन्नई,. २५ - एका ३५ वर्षीय इसमाने आपल्या पत्नीसह तीन मुलींची हत्या करून त्यांच्या मृतदेहांसह दोन दिवस घरातच काढल्याची धक्कादायक घटना चेन्नईमध्ये घडली आहे. मात्र मृतदेह कुजल्याने वास येऊ लागल्याने घरमालकाने पोलिसांना खबर दिल्याने पोलिसांनी त्या मारेक-याला अटक केली. 
चिन्नराज असे त्या इसमाचे नाव असून त्याचे मिठाईचे दुकान आहे. तो पत्नी व तीन मुलींसह चेन्नईतील मुथु मार्गावरील एका इमारतीत रहायचा मात्र गेल्या महिन्याभरापासून त्याची पत्नी व सावत्र मुलींनी त्याला घरात येऊ दिले नव्हते. याचाच राग मनात ठेवून त्याने पत्नी पंडीम्मल (३८) व तिच्या तीन तीन मुली (वय अनुक्रमे १९, १७ व १५) यांच्या डोक्यात लोखंडी रॉड घालून हत्या केली व त्यांचे मृतदेह दोन दिवस घरातच ठेवले. 
मात्र घरमालकाने घरातून दुर्गंधी येत असल्याची तक्रार पोलिसांत केली असता, पोलिसांनी दरवाजा तोडला असता चारही जणांचे मृतदेह त्यांना आढळले. त्यावेळी चिन्नराज मरीना बीच येथील आपली गाडी आणण्यासाठी गेला होता, पोलिसांच्या पथकाने तेथेच त्याच्या मुसक्या आवळल्या. 
पोलिसांसमोर चिन्नराजने आपला गुन्हा कबूल केला. मुळचा कृष्णगिरी जिल्ह्यातील बर्गुर येथील रहिवासी असलेल्या चिन्नराजची ४ वर्षांपूर्वी पंडिम्मल हिच्याशी ओळख झाली. पहिल्या नव-याने टाकून दिल्यावर ती आपल्या तीन मुलींसह रहात असे व इडल्या विकून आपल्या उदरनिर्वाह करत असे. चिन्नराज व तिची ओळख झाल्यानंतर काही दिवसांतच त्यांनी लग्न केले व ते पाचहीजण एका छोट्याशा घरात राहू लागले. मात्र छोट्या घरामुळे त्यांच्यात वादविवाद होऊ लागले व मुली वयात येऊ लागल्यामुळे पंडिम्मल हिने चिन्नराजला घरात येण्यापासून रोखले. गेल्या महिन्याभरापासून तो घराबाहेरच झोपत असे. यामुळे वैतागलेल्या चिन्नराजने २० जून रोजी घरात घुसून पत्नी व मुलींची हत्या केली व मृतदेह दोन दिवस घरातच लपवून ठेवले. 
पोलिसांनी त्याला अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता त्याची रवानगी तुरूंगात करण्यात आली. 
 

Web Title: After killing his three step daughters with his wife, he 'took' two days in the house with the bodies