शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
2
निवडणूक आयोगाने आधारहीन म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, स्पष्टीकरणासह त्या दाव्यातील हवाच काढली
3
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
4
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
5
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
6
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
7
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी
8
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
9
सरकारी कर्मचारी-पेन्शनधारकांची दिवाळी होणार गोड! किती वाढणार पगार? मोठी अपडेट समोर
10
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
11
Pune Firing: दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
12
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
13
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस
14
सासऱ्याच्या मृत्यूनंतर सून ढसाढसा रडली, संशय येताच पोलखोल झाली; 'ते' सत्य लपवण्यासाठी...
15
महाराष्ट्रातील या मतदारसंघात झाली मतचोरी, हजारो मतदार वाढले, राहुल गांधींचा पुराव्यानिशी सनसनाटी आरोप 
16
सेफ्टीमध्ये 'TATA'च एक नंबर, सलग नवव्या गाडीला मिळालं 5 स्टार रेटिंग; कोणती आहे कार?
17
जगातील सर्वात महान कर्णधार कोण? किरॉन पोलार्डनं 'या' दिग्गजाचं घेतलं नाव!
18
VIDEO: पाकिस्तानी खेळाडूने अंपायरच्या डोक्याला मारला चेंडू, अक्रमने केली 'घाणेरडी' कमेंट
19
मंदीच्या खाईत जाणाऱ्या अमेरिकन अर्थव्यवस्थेला वाचवण्यासाठी फेडचा मोठा डाव! भारतावर होणार थेट परिणाम
20
'डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष, जगाचे सम्राट नाहीत, त्यांच्या चुकांची किंमत...'; ब्राझीलच्या राष्ट्रपतींनी सुनावले

CoronaVirus: गोव्यानंतर आणखी एक राज्य कोरोनामुक्त; छोट्या राज्यातून आली मोठी बातमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2020 06:45 IST

संपूर्ण ईशान्य भारतात आजघडीला एकही नवा रुग्ण नाही

इम्फाळ : मणिपूर राज्य कोरोना संसर्गापासून मुक्त झाल्याची अतिशय आनंदाची बातमी मुख्यमंत्री एन. बिरेनसिंह यांनी सोमवारी साऱ्या देशाला दिली. या राज्यात असलेले कोरोना विषाणूचा संसर्ग झालेले दोन रुग्ण उपचारानंतर पूर्ण बरे झाल्याचेही त्यांनी सांगितले.ईशान्य भारतामध्ये कोरोनाचा फैलाव कमी झाला असून तिथे सोमवारपासून काही ठिकाणी लॉकडाऊनचे नियम शिथिल करण्यात आले. आसाममध्ये गेल्या आठवड्याच्या अखेरीपर्यंत कोरोना रुग्णांची संख्या ३४ झाली असून, त्यातील एक जण मरण पावला. या राज्यातील कोरोना रुग्णांपैकी १७ जण उपचारानंतर पूर्ण बरे झाले आहेत. उर्वरित रुग्णांनाही त्यांची प्रकृती ठीक होताच रुग्णालयातून घरी पाठविले जाईल.रुग्णाने प्रवासाची माहिती लपविलीगेल्या महिन्यात चीनमधून आसाममध्ये परतलेल्या एका व्यक्तीला पोलिसांनी अटक केली होती. या विदेश प्रवासाची माहिती दडवून ठेवल्याने त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याला १४ दिवस क्वारंटाइनमध्ये ठेवण्यात आले होते. ईशान्य भारतातील कोरोनाचा पहिला रुग्ण मणिपूरमध्येच आढळून आला होता. या व्यक्तीने कोलकाता व इम्फाळ येथे वास्तव्य केले होते. त्याला कोरोनाची बाधा झाल्याचे २५ मार्च रोजी वैद्यकीय चाचणी अहवालातून स्पष्ट झाले. कोरोनाची लागण झालेल्या व्यक्तीच्या किती जण संपर्कात आले होते याचा पोलिसांनी शोध घेऊन त्यांचीही वैद्यकीय चाचणी करण्यात आली होती. या राज्यात सुदैवाने कोरोनाचे दोनच रुग्ण आढळून आले होते.सर्वांचे सहकार्य, नियमांच्या पालनामुळे यशमणिपूरमध्ये रविवारपासून कोरोना विषाणूचे नवे रुग्ण आढळून आलेले नाहीत. केवळ मणिपूरच नव्हे तर ईशान्य भारतातील इतर सात राज्यांत एकही नवीन रुग्ण आढळून आला नाही. जनतेने दिलेले सहकार्य व डॉक्टर, अन्य वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी घेतलेले परिश्रम व लॉकडाऊनच्या नियमांची केलेली कडक अंमलबजावणी यामुळेच मणिपूर कोरोना विषाणूमुक्त होऊ शकले.-एन. बिरेनसिंह, मुख्यमंत्री, मणिपूर

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याgoaगोवा