शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

लग्न लागताच नववधूचा ठिय्या! हनिमूनला जाणं टाळलं; पतीसोबत मैदानात, तीव्र आंदोलनाचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2023 17:01 IST

राजस्थानमधील जोधपूर येथून एक अनोखी घटना समोर आली आहे.

नवी दिल्ली : राजस्थानमधील जोधपूर येथून एक अनोखी घटना समोर आली आहे. इथे नववधूने लग्न लागताच आंदोलनस्थळ गाठून सर्वांचे लक्ष वेधले आहे. खरं तर तिने हनिमूनला जाणे टाळले आणि आंदोलनात सहभाग नोंदवला. आपल्या मागण्या मान्य झाल्याशिवाय माघार घेणार नसल्याचे तिने यावेळी सांगितले. ही अनोखी घटना जोधपूर जिल्ह्यातील फलौदी कस्बे येथील असून हे आंदोलन मागील 23 दिवसांपासून सुरू आहे.

दरम्यान, इथे जवळपास 3 आठवड्यांपूर्वी अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीला फलौदी येथील शासकीय रूग्णालयात नेण्यात आले होते. इथे प्राथमिक उपचार केल्यानंतर जखमीला जोधपूर येथे हलवण्यात आले. दुर्दैवाने जखमी व्यक्तीचा रस्त्यातच मृत्यू झाला. फलौदी रूग्णालयात डॉक्टरांची कमतरता आहे. इथे किरकोळ अपघातानंतर देखील पीडितांना जोधपूरला रवाना केले जाते. त्यामुळे काहींना उपचाराअभावी जीव गमवावा लागतो. 18 जानेवारी रोजी ललित रंगा उर्फ ​​ललित हिंदू या तरूणीने जिल्हा रुग्णालयातील कारभार सुधारण्याच्या मागणीसाठी फलौदी येथे आंदोलन सुरू केले होते. 

27 जानेवारीला झाले होते लग्न तर, 27 जानेवारीला ललित हिंदू या तरूणीचे लग्न होणार होते. लग्नाचा कार्यक्रम लक्षात घेऊन ललितच्या सहकाऱ्यांनी आंदोलन सुरू ठेवले. 27 जानेवारी रोजी विवाह झाल्यानंतर नवविवाहित जोडपे विवाह मंडपातून उठून आंदोलनस्थळ, जयनारायण व्यास सर्कल येथे पोहोचले. जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत बेमुदत आंदोलन करण्याचा इशारा नवदाम्पत्याने दिला आहे. आता याप्रकरणी गुरुवारी फलौदी बंदची हाक देण्यात आली आहे. बंद दरम्यान तीव्र आंदोलनाचा इशारा देखील देण्यात आला आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

टॅग्स :Rajasthanराजस्थानmarriageलग्नViral Photosव्हायरल फोटोज्