सामूहिक बलात्कारानंतर महिलेच्या मतृदेहाची विटंबना
By Admin | Updated: May 13, 2017 21:24 IST2017-05-13T21:24:09+5:302017-05-13T21:24:09+5:30
हरयाणाच्या रोहतकमध्ये 23 वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार करुन तिची अत्यंत अमानुषपणे हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

सामूहिक बलात्कारानंतर महिलेच्या मतृदेहाची विटंबना
ऑनलाइन लोकमत
रोहतक, दि. 13 - हरयाणाच्या रोहतकमध्ये 23 वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार करुन तिची अत्यंत अमानुषपणे हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या महिलेचा छिन्न-विछन्न झालेला मृतदेह शनिवारी सापडला. भटक्या कुत्र्यांनी पीडित महिलेचा चेहरा आणि अन्य भागांचे लचके तोडले होते.
याप्रकरणी सुमित आणि विकास या दोघांना रोहतक पोलिसांनी अटक केली आहे. सुमितची महिलेबरोबर ओळख होती अशी माहिती सोनीपतचे पोलीस निरीक्षक अजय मलिक यांनी दिली. पीडित महिलेचा घटस्फोट झाला होता. 9 मे ला तिचे सोनीपत येथून अपहरण करुन कारने रोहतक येथे आणले अशी माहिती पोलिसांनी दिली.
पीडित महिलेच्या पालकांनी सोनीपत पोलीस ठाण्यात महिलेच्या बेपत्ता होण्याची तक्रार दाखल केली होती. महिलेवर आधी बलात्कार करण्यात आला. त्यानंतर तिचे डोके पकडून दगडावर आपटण्यात आले. तिच्या डोक्यावर जखमा होत्या असे पोलिसांनी सांगितले. पोलीस या घटनेची सखोल चौकशी करत आहेत.