शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

'फनी' वादळानंतर मोदी सरकारला 'नवीन' बळ; सत्तेचं गणित होणार सोपं? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2019 12:42 IST

दोन मोठे नेते निकालाआधीच एकमेकांचं कौतुक करू लागल्यानं राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या आहेत.

ठळक मुद्देनरेंद्र मोदी आणि ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्यातील जवळीक वाढत असल्याचं पाहायला मिळतंय. गरजेच्या वेळी राज्याच्या पाठीशी उभे राहिल्याबद्दल धन्यवाद, अशी कृतज्ञता पटनायक यांनी व्यक्त केली आहे.हे कौतुकाचे बोल भविष्यातील राजकीय समीकरणांची नांदी ठरू शकतात.

लोकसभा निवडणुकीतील मतदानाचा आता फक्त शेवटचा टप्पा उरलाय. १९ मे रोजी आठ राज्यांमधील ५९ जागांसाठी मतदान होणार आहे. त्यामुळे प्रचाराचा धुरळा उडतोच आहे, आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडतच आहेत. असं असताना, निवडणुकीच्या मैदानात आमनेसामने उभे ठाकलेले दोन मोठे नेते निकालाआधीच एकमेकांचं कौतुक करू लागल्यानं राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या आहेत. या 'नवीन' समीकरणाला कारणीभूत ठरलं आहे, ते फनी चक्रीवादळ.

गेल्या शुक्रवारी फनी चक्रीवादळानं ओडिशामध्ये हाहाकार उडवला. या चक्रीवादळात ४१ जणांचा मृत्यू झाला असून मोठी वित्तहानीही झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या परिस्थितीची हवाई पाहणी करून १ हजार कोटींची तातडीची मदतही जाहीर केली आहे. या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर, नरेंद्र मोदी आणि ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्यातील जवळीक वाढत असल्याचं पाहायला मिळतंय. 

फनी चक्रीवादळाआधी नागरिकांच्या स्थलांतराचे आणि नंतर मदत आणि पुनर्वसनाचे काम ओडिशा सरकारने उत्तम प्रकारे केल्याचं प्रशस्तीपत्रक नरेंद्र मोदी यांनी नवीन पटनायक यांना दिलं होतं. त्यांच्या या पत्राला पटनायक यांनी उत्तर पाठवलंय आणि त्यात केंद्राचे आभार मानलेत. गरजेच्या वेळी राज्याच्या पाठीशी उभे राहिल्याबद्दल धन्यवाद, अशी कृतज्ञता त्यांनी व्यक्त केली आहे. निवडणुकीच्या रणसंग्रामात एकमेकांवर टीकास्त्र सोडणाऱ्या या दोन नेत्यांमधील हे कौतुकाचे बोल भविष्यातील राजकीय समीकरणांची नांदी ठरू शकतात, असं जाणकारांना वाटतंय. 

फनी वादळावर या मराठमोळ्या अधिकाऱ्याचा 'विजय' : वाचवले तीन लाख नागरिकांचे प्राण 

लोकसभा निवडणुकीत बहुतांश प्रादेशिक पक्षांनी आपला गट जाहीर केला आहे. परंतु, बीजू जनता दलाचे नेते नवीन पटनायक यांनी आपले पत्ते उघडलेले नाहीत. गेल्या वेळी ओडिशातील २१ पैकी २० खासदार बीजेडीचे होते. यावेळीही त्यांना तसंच यश मिळेल, असा अंदाज आहे. त्यामुळे लोकसभा त्रिशंकू झाल्यास त्यांची भूमिका निर्णायक असेल. बीजू जनता दलाच्या स्थापनेपासून आत्तापर्यंत कधीच नवीन पटनायक यांनी काँग्रेसशी 'हात'मिळवणी केलेली नाही. परंतु, यावेळच्या निवडणुकीत ते भाजपापासूनही दूरच राहिले होते. या पार्श्वभूमीवर, मोदी आणि पटनायक यांच्यातील पत्रव्यवहार, भले औपचारिक असला तरी मैत्रीचे पूल बांधणारा ठरू शकतो.

दरम्यान, फनी चक्रीवादळाचा तडाखा अनेक भागांना बसलाय. सुमारे ५ लाख घरांचं नुकसान झालंय. ही घरं बांधण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत निधी देण्याची विनंती नवीन पटनायक यांनी केली आहे. या योजनेतील नव्या तरतुदीनुसार, घरबांधणीचा ९० टक्के खर्च केंद्र सरकार देतं. आता पंतप्रधान ही विनंती मान्य करून जवळीक आणखी वाढवतात का, हे पाहावं लागेल.

टॅग्स :Fani Cyclone फनी वादळLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Odisha Lok Sabha Election 2019ओडिशा लोकसभा निवडणूक निकाल 2019Narendra Modiनरेंद्र मोदी