शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

पराभव पचवून भाजप ९ वर्षे सोहळ्याच्या तयारीत गुंतला, १ महिना देशभरात जनसंपर्काचे उपक्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2023 12:32 IST

३० आणि ३१ मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत: भाजपच्या महिनाभर चालणाऱ्या विशेष जनसंपर्क अभियानाचे उद्घाटन एका मोठ्या सभेला संबोधित करून करणार आहेत.

संजय शर्मा -नवी दिल्ली : कर्नाटकच्या पराभवाच्या धक्क्यातून भाजप अजून सावरलेला नसताना देशभरात मोदी सरकारला नऊ वर्षे पूर्ण झाल्याचा आनंदोत्सव साजरा करण्याची तयारी करावी लागत आहे. ३० आणि ३१ मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत: भाजपच्या महिनाभर चालणाऱ्या विशेष जनसंपर्क अभियानाचे उद्घाटन एका मोठ्या सभेला संबोधित करून करणार आहेत.कर्नाटकच्या पराभवाच्या धक्क्यातून भाजप अद्याप सावरलेला नाही, मात्र आज भाजपच्या राष्ट्रीय मुख्यालयात भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष यांनी मोदी सरकारला नऊ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने पक्षाच्या राष्ट्रीय सरचिटणीसांची बैठक बोलावून ३० मे ते ३० जूनदरम्यान होणाऱ्या मॅरेथॉन आयाेजनांची यादी जाहीर केली. यानिमित्ताने भाजप देशभरात विशेष जनसंपर्क अभियान राबवणार आहे.सर्वांत मोठी जनसंपर्क मोहीम३० आणि ३१ मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः मध्य प्रदेश, तेलंगणा, राजस्थान या निवडणूक राज्यांमध्ये सभा घेऊन भाजपच्या सर्वांत मोठ्या जनसंपर्क मोहिमेची सुरुवात करणार आहेत. ३० मे रोजी ते स्वतः कामगारांना संबोधित करणार आहेत.भाजपचे नेते देशभरात ५१ ठिकाणी जाहीर सभा घेऊन मोदी सरकारच्या योजनांचा लाभ जनतेला सांगतील. त्यानंतर भाजपचे केंद्रीय नेते देशातील ३९६ लोकसभा मतदारसंघांत संमेलन घेणार आहेत. जनसंपर्क अभियानांतर्गत लोकांचीही भेट घेणार आहेत.

लोकसभेची तयारी...महिनाभर चालणाऱ्या या सोहळ्यात भाजप २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीच्या तयारीची रंगीत तालीमही करणार आहे. जनसंपर्क अभियानाचा एक भाग म्हणून भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री देशातील एक लाख प्रतिष्ठित कुटुंबांच्या घरांना भेटी देतील आणि त्यांना भाजपमध्ये येण्याचे आवाहन करतील. या काळात भाजप नेते देशातील सुमारे २५० मोठे खेळाडू, उद्योगपती, कलाकार आणि व्यावसायिकांना भेटणार आहेत.मोहिमेसाठी बैठका२९ मे रोजी सर्व राज्यांचे भाजप नेते राज्यांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री  लोकांवर प्रभाव टाकणाऱ्यांना भेटतील. २३ जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजपच्या १० लाख बूथ कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत. या मोहिमेच्या तयारीसाठी १६ ते १९ मेदरम्यान सर्व राज्यांमध्ये राज्य कृती समित्यांच्या बैठका होणार आहेत. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा