मांझींना उत्तराधिकारी निवडून चूक केली नितीश कुमारांना पश्चातबुद्धी

By Admin | Updated: February 11, 2015 00:33 IST2015-02-11T00:33:33+5:302015-02-11T00:33:33+5:30

पाटणा : बिहारचे माजी मुख्यमंत्री जीतन राम मांझी डोईजड झाल्यानंतर आता कुठे नितीश कुमार यांना पश्चातबुद्धी झाली आहे़ मांझी यांना माझा उत्तराधिकारी निवडून मी चूक केली, अशी कबुली नितीश यांनी आज मंगळवारी पत्रकारांशी बोलताना दिली़

After choosing Manjhi to succeed, Nitish Kumar was wrong | मांझींना उत्तराधिकारी निवडून चूक केली नितीश कुमारांना पश्चातबुद्धी

मांझींना उत्तराधिकारी निवडून चूक केली नितीश कुमारांना पश्चातबुद्धी

टणा : बिहारचे माजी मुख्यमंत्री जीतन राम मांझी डोईजड झाल्यानंतर आता कुठे नितीश कुमार यांना पश्चातबुद्धी झाली आहे़ मांझी यांना माझा उत्तराधिकारी निवडून मी चूक केली, अशी कबुली नितीश यांनी आज मंगळवारी पत्रकारांशी बोलताना दिली़
नितीश कुमार म्हणाले की, मी सद्भावनेने मांझी यांची मुख्यमंत्रिपदी निवड केली होती़ पण माझा निर्णय चुकीचा होता, हे आठच महिन्यात मला कळून चुकले़ खुद्द मांझीच म्हणाले होते की, मी त्यांना निवडून देऊन मी निर्बुद्धपणाचे काम केले़लोकसभा निवडणुकीत आपल्या पक्षाच्या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून मी राजीनामा दिला होता़ हा निर्णय योग्यच होता़ केवळ माझा उत्तराधिकारी निवडताना मी चुकलो़
नितीश कुमार हे सत्तेचे भुकेले आहेत, असा आरोप मांझी यांनी केला आहे़ नितीश यांनी या आरोपाचे उत्तर देण्यास नकार दिला़ माझ्यावर आरोप करणाऱ्या व्यक्तीच्या पातळीवर नेऊन मला बसवू नका, असे ते म्हणाले़

Web Title: After choosing Manjhi to succeed, Nitish Kumar was wrong

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.