शहरं
Join us  
Trending Stories
1
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
राज ठाकरे 'मातोश्री'वर, पुन्हा मनोमिलनाची चर्चा; दोन्ही भावांची गळाभेट, वीस मिनिटे संवाद
3
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
4
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
5
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
6
पुण्यातील रेव्ह पार्टीवर कारवाई; एकनाथ खडसेंच्या जावयासह ७ अटकेत, दोन महिलांना रंगेहाथ पकडले
7
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
8
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
9
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम
10
अमेरिकेत बोइंग विमानाला आग, १७३ प्रवासी बालंबाल बचावले; लँडिंग गीअर बिघडले, उड्डाण रोखले
11
“रोख व्यवहार हा कायदेशीर वसूलपात्र कर्ज नाही”; केरळ हायकोर्टाचे निरीक्षण, प्रकरण काय?
12
खड्ड्यावरील दंडाला गणेश मंडळांचा विरोध; लहान मूर्तींनाही परवानगी देण्याची बैठकीत मागणी
13
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
14
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
15
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
16
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
17
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
18
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
19
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
20
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!

LOC: चीनच्या जिवावर उडणारा पाकिस्तान भेदरला; भारताला हॉटलाईनवर शांततेचा प्रस्ताव

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2021 13:37 IST

India Pakistan DGMO Level Talks: दोन्ही देशांच्या जनरलनी एओसीसह सर्व सीमाभागातील स्वतंत्र आणि सौहार्दपूर्ण वातावरण ठेवण्यास सहमती दर्शविली. एओसीबाबत जे काही याआधी समझोते झाले आहेत ते पाळण्याचे आश्वासन पाकिस्तानने दिले आहे.

भारतीय हद्दीत घुसखोरी केलेल्या चीनने माघार घेताच त्यांच्या जिवावर भारताला आव्हाने देणारा पाकिस्तान (Pakistan) जमिनीवर आला आहे. भारताला हॉटलाईनवर आता आम्हाला एलओसीवर (Line of Control) शांती हवी आहे, अशा शब्दांत विनवणी करत आहे. आज दोन्ही देशांच्या मिलिट्री ऑपरेशन्सच्या डायरेक्टर जनरलनी (DGMO) फोनवर चर्चा केली आणि सीमेवर शांती प्रस्थापित करण्यासाठी सहमती बनविली. (Pakistan talks on Hotline with India on LOC Peace.)

प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (LOC) शांतता निर्माण करण्यासाठी पाकिस्तानने सर्व करार आणि शस्त्रसंधीचे कडक पालन करणार असल्याचे सांगितले. याला भारतानेही सहमती दिली आहे. ही शस्त्रसंधी 24-25 फेब्रुवारीच्या मध्यरात्रीपासून लागू होणार आहे. 

दोन्ही देशांच्या जनरलनी एओसीसह सर्व सीमाभागातील स्वतंत्र आणि सौहार्दपूर्ण वातावरण ठेवण्यास सहमती दर्शविली. एओसीबाबत जे काही याआधी समझोते झाले आहेत ते पाळण्याचे आश्वासन पाकिस्तानने दिले आहे. तसेच कोणतीही अफवा किंवा गैरसमज दूर करण्यासाठी हॉटलाईनवर चर्चा करण्याबाबतही दोन्ही जनरलनी सहमती दर्शविली आहे. याचबरोबर बॉर्डरवर फ्लॅग मिटिंग घेण्याचे ठरविले आहे. 

Galwan Clash: चीनकडून गलवान घाटीतील हिंसाचाराचा Video जारी; म्हणाला 'भारतच हल्लेखोर'या प्रकारे एलएसीनंतर एलओसीवर देखील शांती निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. परंतू पाकिस्तानव विश्वास ठेवणे कठीण आहे. त्यांनी नेहमी विश्वासघात केला आहे. एकीकडे भारतावर घुसखोरी करण्याचे आरोप करायचे आणि दुसरीकडे सीमेपलिकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करायचे असा दुटप्पीपणा पाकिस्तान करत आला आहे. चीनने भारतीय जवानांवर हल्ला केला तेव्हाही पाकिस्तानने संधी साधण्याचा प्रयत्न केला होता. सैन्याला भारताशी युद्ध करण्यासाठी तयार राहण्याचे आदेश दिले होते. तसेच पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनीदेखील भारतासोबत युद्धखोरीची भाषा केली होती. परंतू चीनची डाळ न शिजल्याने पाकिस्तान पुन्हा एकदा जमिनीवर आला आहे. 

अखेर चीनने गलवानमधील नामुष्की कबूल केलीगतवर्षी लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (LAC) चिनी सैन्याने घुसखोरीचा प्रयत्न केल्याने तणाव निर्माण झाला होता. (India China faceoff ) या तणावादरम्यान, भारतीय लष्कर (Indian Army) आणि चिनी सैन्यामध्ये (PLA) हिंसक झटापट झाली होती. या झटापटीत भारताच्या २० जवानांना वीरमरण आले होते. तर चीनचेही अनेक सैनिक मारले गेल्याचा दावा करण्यात येत होता. मात्र चीन सरकारकडून या झटापटीत चिनी सैन्याची जीवितहानी झाल्याचे वृत्त सातत्याने नाकारले जात होते. मात्र आता चिनी सरकारने या झटापटीत आपले सैनिक मारले गेल्याचे कबूल केले आहे. तसेच या सैनिकांची नावेही जाहीर केली आहेत.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानIndiaभारतborder disputeसीमा वादBorderसीमारेषाIndian Armyभारतीय जवान