Galwan Clash: चीनकडून गलवान घाटीतील हिंसाचाराचा Video जारी; म्हणाला 'भारतच हल्लेखोर'

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2021 08:05 PM2021-02-19T20:05:06+5:302021-02-19T20:06:09+5:30

Galwan Clash Video: या व्हिडीओमध्ये नदीच्या किनाऱ्यावर चीनी पोस्ट दिसत आहे. तर चीनच्या एका अधिकाऱ्यासमोर भारतीय जवान आक्रमक झाल्याचे दिसत आहे. या घटनेनंतर भारतीय जवानांना चीनच्या सैनिकांनी मोठ्या संख्येने घेरल्याचेही दाखविण्यात आले आहे.

india china faceoff: China releases video of Galwan Clash violence; Says 'India is the aggressor' | Galwan Clash: चीनकडून गलवान घाटीतील हिंसाचाराचा Video जारी; म्हणाला 'भारतच हल्लेखोर'

Galwan Clash: चीनकडून गलवान घाटीतील हिंसाचाराचा Video जारी; म्हणाला 'भारतच हल्लेखोर'

Next

बिजिंग : लडाखमध्ये गेल्या वर्षी भारतीय जवानांवरचीनी सैनिकांनी केलेल्या जिवघेण्या हल्ल्याचा व्हिडीओ चीनने जारी केला आहे. यामध्ये चीनने नाही तर भारतानेच हल्ला केल्याचे दाखविण्यात आले आहे. चीनचे वृत्तपत्र ग्लोबल टाईंम्सने हा व्हिडीओ जारी करत भारतानेच हल्ला केल्याचा आरोप केला आहे. भारतीय सैन्याकडून अद्याप या व्हिडीओवर काही प्रतिक्रिया आलेली नाही. (China's Globle Times release Galwan Clash Video of Ladakh.)


या व्हिडीओमध्ये नदीच्या किनाऱ्यावर चीनी पोस्ट दिसत आहे. तर चीनच्या एका अधिकाऱ्यासमोर भारतीय जवान आक्रमक झाल्याचे दिसत आहे. या घटनेनंतर भारतीय जवानांना चीनच्या सैनिकांनी मोठ्या संख्येने घेरल्याचेही दाखविण्यात आले आहे. यावेळी चीनी सैनिकांच्या हातात लाढ्या काठ्या आहेत. एडीट केलेल्या या व्हिडीओत काही वेळाने एका चीनी सैनिकाचे फुटलेले डोके दाखविण्यात आले आहे. यानंतर गलवान घाटीत मारल्या गेलेल्या चीनी सैनिकांचे फोटो दाखविण्यात आले आहेत. हा व्हिडीओ जुना असल्याचे जानकारांनी म्हटले आहे. 


चीनच्या सेंट्रल मिल‍िट्री कमिशनने की फाबाओ यांना 'हीरो' चा सन्मान दिला आहे. भारतीय सैन्याने अनधिकृतपणे प्रत्यक्ष नियंत्रण रेषा पार केली होती. भारतीय जवानांच्या हाती स्टीलच्या लाठ्या, ट्यूब आणि दगड होते. त्यांनी याद्वारे आमच्या सैनिकांवर हल्ला केला. एप्रिल 2020 मध्ये भारताने पहिल्यांदा समझोत्याचे उल्लंघन केले. रस्ते आणि पूल बनविण्यासाठी ते आमच्या सीमेत घुसले, असा आरोप चीनने केला आहे. 


चीनच्या सैन्याच्या वृत्तपत्राने सांगितले की, भारतीय सैन्याने जाणूनबुजून आमच्या सैनिकांना उकसवले. तसेच सीमेवरील परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न केला. भारतीय सैनिकांनी त्यांच्याशी बोलण्यास गेलेल्या आमच्या सैनिकांवर हल्ला केला. आमच्यापेक्षा त्यांची संख्या जास्त होती. मात्र, आम्ही घाबरलो नाही. त्यांच्या दगडफेकीनंतरही आम्ही त्यांना माघारी धाडले, असे एका चेन नावाच्या सैनिकाने त्याच्या डायरीत लिहिले आहे. 

Web Title: india china faceoff: China releases video of Galwan Clash violence; Says 'India is the aggressor'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.