शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

कर्नाटकमधील मंत्रिमंडळ विस्तारानंतर काँग्रेस, जेडीएसच्या आमदारांमध्ये असंतोष

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2018 15:05 IST

खातेवाटपावरून खोळंबलेला कर्नाटकमधील कुमारस्वामी सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार अखेर बुधवारी झाला. मात्र या विस्तारानंतर मंत्रिमंडळात स्थान न मिळालेल्या काँग्रेस आणि जनता दल सेक्युलरच्या आमदारांची नाराजी उफाळून आली आहे.

बंगळुरू - खातेवाटपावरून खोळंबलेला कर्नाटकमधील कुमारस्वामी सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार अखेर बुधवारी झाला. मात्र या विस्तारानंतर मंत्रिमंडळात स्थान न मिळालेल्या काँग्रेस आणि जनता दल सेक्युलरच्या आमदारांची नाराजी उफाळून आली आहे. मंत्रिपदासाठी इच्छुक असलेल्या आमदारांचे समर्थकांनी रस्त्यावर उतरून विरोध नोंदवला, तर काही समर्थकांनी अंगावर रॉकेल ओलून आत्मदन करण्याचा प्रयत्न केला. बुधवारी झालेल्या कुमारस्वामी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये काँग्रेसच्या 15 तर जनता दल सेक्युलरच्या 10 आमदारांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आली. मात्र या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये राज्यातील काँग्रेसच्या अनेक बड्या नेत्यांना स्थान देण्यात न आल्याने त्यांची आणि त्यांच्या समर्थकांची नाराजी प्रकर्षाने समोर आली. सिद्घारामय्या सरकारमध्ये महत्त्वाची खाती सांभाळणाऱ्या नेत्यांना मंत्रिपद देण्यात आले नाही.  एच.के. पाटील, रामलिंग रेड्डी, रोशन बेग, एम.बी. पाटील आणि तन्वीर सैत आदी नेत्यांचे नाव मंत्रिपदासाठी शर्यतीत होते. मात्र शेवटच्या क्षणी या सर्वांना धक्का देत नव्या चेहऱ्यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले. त्यामुळे नाराज झालेल्या काँग्रेस नेत्यांचे समर्थक रस्त्यावर उतरले. कर्नाटकमध्ये लिंगायतांना वेगळ्या धर्माचा दर्जा देण्यासाठी आग्रही असलेल्या एम. बी. पाटील यांनी पक्ष सोडण्याची धमकी दिली.  त्यामुळे त्यांची मनधरणी करण्यासाठी कुष्ण बैरगौडा आणि विनय कुलकर्णी यांची पाठवणी करण्यात आली. तर एच. के. पाटील यांच्या समर्थकांनी पक्षाला सोडचिठ्ठी देण्याची धमकी दिली. दुसरीकडे तन्वीर सैत यांच्या समर्थकांनी रस्त्यावर उतरून स्वत:वर रॉकेल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला. राज्यातील नेत्यांना या निवडणुकीचे योग्य महत्त्व न समजल्याने आणि सरकारमध्ये दुय्यम सहकारी म्हणून सहभागी व्हावे लागल्याने संतप्त झालेल्या पक्षश्रेष्ठींनी राज्यातील काही नेत्यांना धक्का दिल्याचे बोलले जात आहे. दुसरीकडे जनता दल सेक्युलरलाही आमदारांच्या नाराजीचा सामना करावा लागला. एम.सी. मनुगुली यांचे समर्थक तर माजी पंतप्रधान एच.डी. देवेगौडा यांच्या घरी मोर्चा घेऊन गेले. मात्र मनुगुली यांचे नाव संभाव्य मंत्र्यांच्या यादीत असल्याचे समजल्यावर ते शांत झाले. दरम्यान, काल झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये काँग्रेसने 7 तर जनता दल सेक्युलरने  6 नव्या चेहऱ्यांना मंत्रिमंडळात स्थान दिले आहे.   

टॅग्स :Karnatak Politicsकर्नाटक राजकारणKarnataka Election Results 2018कर्नाटक निवडणूक निकाल २०१८kumarswamyकुमारस्वामीcongressकाँग्रेसJanata Dal (Secular)जनता दल (सेक्युलर)