शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

मुहूर्ताची वेळ जवळ आलेली असताना लग्नमंडपातून वधू आणि वर दोघांनीही ठोकली धूम

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2018 12:24 IST

मुहूर्ताची वेळ जवळ आलेली असताना वधू आणि वर दोघेही लग्नमंडपातून पळून गेल्याची अजब घटना चन्नाकल मालुर येथे घडली. लग्नासाठी केलेला खर्च आणि दोन्ही कुटुंबांच्या इभ्रतीचा विचार करुन ज्येष्ठांनी या समस्येवर तोडगा काढला.

ठळक मुद्देसर्व प्रकारामुळे हताश झालेला नवरदेव मुहूर्ताच्या काहीवेळ आधी अचानक गायब झाला.   नवरदेवाकडची मंडळी पाच वाजताच हॉलवर पोहोचली, पण वधूपक्षाकडून सात वाजले तरी कोणीही आले नाही. 

कोलार - मुहूर्ताची वेळ जवळ आलेली असताना वधू आणि वर दोघेही लग्नमंडपातून पळून गेल्याची अजब घटना कर्नाटकाच्या चन्नाकल मालुर येथे घडली. वर पक्षाकडची मंडळी पद्मावती कल्याण मंडप येथे वधूची वाट पाहत थांबलेले असताना वधू तिच्या प्रियकरासोबत पळून गेली. नवरी मुलीच्या अशा वागण्यामुळे सर्वांनाच धक्का बसला होता. लग्नासाठी केलेला खर्च आणि दोन्ही कुटुंबांच्या इभ्रतीचा विचार करुन ज्येष्ठांनी या समस्येवर तोडगा काढला. त्यांनी लग्नासाठी पळून गेलेल्या वधूच्या चुलत बहिणीला तयार केले. 

पण या सर्व प्रकारामुळे हताश झालेला नवरदेव मुहूर्ताच्या काहीवेळ आधी अचानक गायब झाला.   त्यामुळे अखेर हे लग्न रद्द झाले. बंगळुरुपासून 46 किलोमीटर अंतरावर असलेल्या चन्नाकल मालुर येथे शनिवारी हे नाटय घडले. पद्मावती कल्याण मंडप हॉलमध्ये लग्नाआधीच्या विधींसाठी रिसेप्शन आयोजित केले होते. नवरदेवाकडची मंडळी पाच वाजताच हॉलवर पोहोचली. पण वधूपक्षाकडून सात वाजले तरी कोणीही आले नाही. 

संध्याकाळी सातपासून विधी सुरु होणार होते. मुलाकडच्यांनी वधूच्या आई-वडिलांशी फोनवरुन संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण त्यांचा फोन स्विचऑफ येत होता. काहीतरी वाईट घडलय असा त्यांना संशय आला. वरपक्षाने लगेच वधूचे गाव गाठले. त्यावेळी वधू तिच्या प्रियकरासोबत पळून गेल्याचे त्यांना समजले. आपली फसवणूक झालीय हे समजल्यानंतर वर पक्षाचा पारा चढला. दोन्ही बाजूंमध्ये बरीच वादावादी झाली. तणाव वाढला होता. 

अखेर ज्येष्ठांनी यावर तोडगा काढला आणि वधूच्या चुलत बहिणीला लग्नासाठी तयार केले. रविवारी सकाळी लग्नापूर्वीच्या विधींना सुरुवात झाली होती. दोन्हीकडचे कुटुंबिय सकाळी 8.15 ते 9 दरम्यानच्या मुहूर्ताची तयारी करत होते. पण त्याच दरम्यान वर मुलगा त्याच्या कक्षात नसल्याचे समजले. बरीच शोधाशोध करुनही वर मुलगा कुठेही सापडला नाही. अखेर दोन्हीकडच्यांनी हा विवाह मोडल्याचे जाहीर केले.