शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

'यूपी-बिहारवाले नोकऱ्या बळकावतात'

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2018 10:35 IST

उत्तर प्रदेश आणि बिहारमधील लोक नोकऱ्या बळकावतात. त्यामुळे राज्यातील तरुणांना राज्यातील उद्योगात 70 टक्के प्राधान्य देण्यात येणार असल्याचं कमलनाथ यांनी स्पष्ट केलं आहे. 

ठळक मुद्देउत्तर प्रदेश आणि बिहारमधील लोक नोकऱ्या बळकावतात. त्यामुळे राज्यातील तरुणांना राज्यातील उद्योगात 70 टक्के प्राधान्य देण्यात येणार असल्याचं कमलनाथ यांनी स्पष्ट केलं.ज्यातील उद्योग-व्यवसायात 70 टक्के रोजगार भूमिपुत्रांना देण्याच्या नियमावर त्यांनी स्वाक्षरी करून नियम लागूही केला आहे.स्थानिक तरुणांना रोजगाराच्या संधी निर्माण व्हाव्यात म्हणून गार्मेंट पार्क उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

भोपाळ - मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच कमलनाथ यांनी सोमवारी (17 डिसेंबर) पहिला सर्वात मोठा निर्णय घेतला आहे. कमलनाथ सरकारने शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला. काँग्रेसने निवडणूक प्रचारादरम्यान शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन दिले होते. कमलनाथ यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच त्यांनी हे आश्वासन पूर्ण केलं आहे. यानंतर राज्यातील उद्योग-व्यवसायात 70 टक्के रोजगार भूमिपुत्रांना देण्याच्या नियमावर त्यांनी स्वाक्षरी करून नियम लागूही केला आहे. उत्तर प्रदेश आणि बिहारमधील लोक नोकऱ्या बळकावतात. त्यामुळे राज्यातील तरुणांना राज्यातील उद्योगात 70 टक्के प्राधान्य देण्यात येणार असल्याचे कमलनाथ यांनी स्पष्ट केले आहे. 

मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर घेतलेल्या पहिल्याच पत्रकार परिषदेत कमलनाथ यांनी ही माहिती दिली. कमलनाथ यांनी 'जे उद्योग आणि कंपन्या भूमिपुत्रांना 70 टक्के रोजगार देतील, त्यांनाच राज्यात गुंतवणुकीसाठीच्या सवलती मिळतील', असं सांगितलं. तसेच 'उत्तर प्रदेश आणि बिहारसारख्या राज्यातून लोक येतात, स्थानिक तरुणांना रोजगार मिळत नाही. त्यामुळेच मी या नव्या नियमाच्या फाईलवर स्वाक्षरी केली आहे', असंही कमलनाथ म्हणाले. मध्य प्रदेशात चार गार्मेंट पार्क सुरू करण्याची घोषणाही केली. स्थानिक तरुणांना रोजगाराच्या संधी निर्माण व्हाव्यात म्हणून गार्मेंट पार्क उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या गार्मेंट पार्कमध्ये स्थानिक तरुणांना रोजगार देणाऱ्या उद्योगांनाच प्रमोट केलं जाईल, असंही कमलनाथ यांनी सांगितलं. 

मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर अवघ्या तासाभरात कमलनाथ यांनी मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील शेतकऱ्यांचं कर्ज माफ करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. मुख्यमंत्रीपदाची धुरा खांद्यावर घेताच त्यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भातील फाईलवर स्वाक्षरी केली. कमलनाथ यांच्या निर्णयाचा लाभ 2 लाखांपर्यंतचं कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना मिळणार आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर त्यांनी हा मोठा निर्णय घेतला. मुख्य सचिव बसंत प्रताप सिंग यांनी अर्थ आणि कृषी मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतल्यानंतर कमलनाथ यांनी कर्जमाफीच्या फाईलवर स्वाक्षरी केली.

सध्या राज्यातील 41 लाख शेतकऱ्यांच्या डोक्यावर 56,377 कोटी रुपयांचे कर्ज आहे. यातील जवळपास 12 हजार कोटी रुपयांचे कर्ज बुडीत खात्यात गेले आहे. सोमवारी दुपारी कमलनाथ यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. जांबुरी मैदानावर त्यांचा शपथविधी सोहळा संपन्न झाला. या सोहळ्याला काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी आणि माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग उपस्थित होते. कमलनाथ काँग्रेसचे 18वे मुख्यमंत्री आहेत. शपथविधी सोहळ्यानंतर अवघ्या तासाभरात कमलनाथ यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय घेतला आहे. 

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशFarmerशेतकरीUttar Pradeshउत्तर प्रदेशBiharबिहारjobनोकरी