शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
4
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
5
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
6
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
7
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
8
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
9
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
10
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
11
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
12
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
13
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
14
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
15
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
16
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
17
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
18
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
19
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
20
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

डेटा लीक वाद : बिग बॉसनंतर आता छोटा भीमची एंट्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2018 21:36 IST

फेसबूक डेटा लीक प्रकरणापासून सत्ताधारी भाजपा आणि काँग्रेसमध्ये सुरू झालेला वाद विकोपाला पोहोचला आहे. दोन्ही पक्षांकडून एकमेकांविरोधात आरोप-प्रत्यारोपांची चिखलफेक होत आहे. आता तर या वादात बिग बॉसनंतर छोटा भीमचीही एंट्री झाली आहे.

नवी दिल्ली - फेसबूक डेटा लीक प्रकरणापासून सत्ताधारी भाजपा आणि काँग्रेसमध्ये सुरू झालेला वाद विकोपाला पोहोचला आहे. दोन्ही पक्षांकडून एकमेकांविरोधात आरोप-प्रत्यारोपांची चिखलफेक होत आहे. आता तर या वादात बिग बॉसनंतर छोटा भीमचीही एंट्री झाली आहे. एकीकडे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी भारतीयांची हेरगिरी करण्याच्या प्रयत्नात असल्याचा आरोप करत मोदींची बिग बॉस म्हणून तुलना केली आहे, तर त्याला प्रत्युत्तर देताना भाजपाच्या नेत्या स्मृती इराणी यांनी राहुल गांधी यांना छोटा भीम हे विशेषण म्हटले आहे. मोदींवर टीका करताना राहुल गांधी म्हणाले होते की, "मोदी यांचे नमो अॅप गोपनीय पद्धतीने तुमचे ऑडिओ व्हिडिओ, तुमच्या मित्रांचे आणि कुटुंबीयांचे संपर्क क्रमांक रेकॉर्ड करत आहे. तसेच जीपीएस प्रणालीद्वारे आपला पत्ता जाणून घेत आहे. ते बिग बॉस आहेत जे भारतीयांची हेरगिरी करत आहेत." मात्र राहुल गांधी यांच्या या टीकेचा स्मृती इराणी यांनी खरपूस समाचार घेतला आहे. "राहुल गांधीजी हे काय चालले आहे. तुम्ही जे सांगत आहात त्याच्या उलट तुमची टीम काम करत आहे. नमो अॅप डिलीट करण्याऐवजी त्यांनी काँग्रेसचेच अॅप डिलीट केले आहे. आता आपण तंत्रज्ञानाचा विचार करायला गेलो तर काँग्रेस आपला डेटा सिंगापूरमधील सर्व्हरमध्ये का पाठवते. जिथून हा डेटा कोणताही टॉम, डिक किंवा अॅनॅलिटिका मिळवू शकते.  राहुलजी छोटा भीमसुद्धा जाणतो की सर्वसामान्यपणे अॅपवर मागण्यात आलेल्या परवानगीचा अर्थ हेरगिरी होत नाही,"असा टोला स्मृती इराणी यांनी हाणला आहे.  

 

टॅग्स :Politicsराजकारणcongressकाँग्रेसBJPभाजपाSmriti Iraniस्मृती इराणीRahul Gandhiराहुल गांधी