कांदा लिलावानंतर रोख पैसे या बातमीचा जोड

By Admin | Updated: May 6, 2014 17:09 IST2014-05-06T17:09:04+5:302014-05-06T17:09:04+5:30

कांदा विक्रीचे रोख पेमेंट न करणार्‍या व्यापार्‍यांबाबत बाजार समितीने कडक धोरण अवलंबले आहे. शेतकरी व व्यापार्‍यांचे जवळीकीचे संबंध असल्याने शेतकरी आमच्याकडे तक्रार करत नाहीत. व्यापार्‍यांकडून रोख पेमेंट घेण्याबाबत तक्रार करत नाहीत. व्यापार्‍यांकडून रोख पेमेंट येऊन त्याचेवर योग्य त्या व्यापार्‍याची कांदा खरेदी थांबविण्यात येऊन त्याचेवर योग्य ती कारवाई करण्यात येईल.

After the auction of cash, news of cash | कांदा लिलावानंतर रोख पैसे या बातमीचा जोड

कांदा लिलावानंतर रोख पैसे या बातमीचा जोड

ंदा विक्रीचे रोख पेमेंट न करणार्‍या व्यापार्‍यांबाबत बाजार समितीने कडक धोरण अवलंबले आहे. शेतकरी व व्यापार्‍यांचे जवळीकीचे संबंध असल्याने शेतकरी आमच्याकडे तक्रार करत नाहीत. व्यापार्‍यांकडून रोख पेमेंट घेण्याबाबत तक्रार करत नाहीत. व्यापार्‍यांकडून रोख पेमेंट येऊन त्याचेवर योग्य त्या व्यापार्‍याची कांदा खरेदी थांबविण्यात येऊन त्याचेवर योग्य ती कारवाई करण्यात येईल.
केदा आहेर, सभापती देवळा कृषी उत्पन्न बाजार समिती

बाजार समितीने व्यापार्‍यांच्या मनमानीबद्दल कडक धोरण अवलंबविले. लिलाव गांभीर्याने झाले पाहिजे. प्रत्येक वाहनाजवळ कांद्याचा लिलाव करताना सर्व व्यापारी हजर राहिले पाहिजे. लिलावाच्या वेळी व्यापार्‍यांना भ्रमणद्वीवरून बोलण्यास बंदी घालण्यात यावी, बाजार समितीचा एक कर्मचारी लिलावाच्या वेळी हजर पाहिजे.
हिरामण पंढरीनाथ वाघ
शेतकरी, खामखेडा

बाजार समितीच्या आवारात कांद्याने भरलेली वाहने बेशिस्तपणे लावलेली असतात. यामुळे उशिरा आलेल्या वाहनांचा काहीवेळा लवकर लिलाव होऊन जातो. यामुळे अगोदर आलेल्या शेतकर्‍यांवर अन्याय होतो. यासाठी बाजार समितीच्या आवारात येण्यापूर्वी गेटवरच त्या वाहनाला बाजार समितीच्या कर्मचार्‍यांमार्फत क्रमांक देण्यात यावा व त्या क्रमांकानुसारच लिलाव करण्यात यावा.
ज्ञानेश्वर दोधा देवरे
शेतकरी, वाजगाव

रोख पेमेंट न करणार्‍या व्यापार्‍यांवर कारवाई करण्याचा बाजार समितीचा निर्णय स्तुत्य आहे. ‘ा निर्णयाची कठोरपणे बाजार समितीने अंमलबजावणी करावी.
राजकुमार सूर्यवंशी
शेतकरी, वाजगाव

निसर्गाचा लहरीपणा, गारपीट व अवकाळी पावसामुळे चालूवर्षी कांद्याची प्रत घसरली असून दर्जेदार कांदा फारसा बाजारात येत नाही. दर्जेदार नसलेला कांदा लवकर खराब होत असल्याने त्याचे दर ठरवताना अडचण निर्माण होतो.
कांदा व्यापारी,
देवळा.

(वार्ताहर)

Web Title: After the auction of cash, news of cash

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.