पाक हेराच्या अटकेनंतर दक्षिणेत चोख सुरक्षा

By Admin | Updated: September 15, 2014 03:02 IST2014-09-15T03:02:41+5:302014-09-15T03:02:41+5:30

पाकिस्तानची गुप्तचर संघटना आयएसआयसाठी काम करण्याच्या आरोपाखाली श्रीलंकेच्या आणखी एका नागरिकाला अटक

After the arrest of the Pak Heritage, the security of the super-south | पाक हेराच्या अटकेनंतर दक्षिणेत चोख सुरक्षा

पाक हेराच्या अटकेनंतर दक्षिणेत चोख सुरक्षा

नवी दिल्ली : पाकिस्तानची गुप्तचर संघटना आयएसआयसाठी काम करण्याच्या आरोपाखाली श्रीलंकेच्या आणखी एका नागरिकाला अटक झाल्यानंतर केंद्रीय सुरक्षा संस्थानी देशातील दक्षिणेकडील राज्यातील संरक्षण आणि परदेशी महावाणिज्य दूतावास यासह महत्त्वाच्या प्रतिष्ठानांची निगराणी वाढविली आहे.
राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) गेल्या आठवड्यात चेन्नईमध्ये अरुण सेल्वराजन यास अटक केली होती. त्याच्याकडून तटरक्षक दल परिसरासारख्या संरक्षण प्रतिष्ठानांचे नकाशे आणि काही संवेदनशील दस्ताऐवज हस्तगत केले होते.
राजनैतिकदृष्टीने महत्त्वाच्या काही ठिकाणांची माहिती कोलंबो येथील आयएसआयशी संबंधित लोकांना दिली, असे सेल्वराजन याने प्राथमिक चौकशीत सांगितले. सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे. सेल्वराजन हा लिट्टे या दहशतवादी गटाचा समर्थक असल्याने श्रीलंकेत ‘वॉन्टेड’ आहे.
एनआयए चेन्नई येथील एका न्यायालयाकडे अर्ज केला असून, सेल्वराजन याला पोलीस कोठडी मिळण्याची शक्यता आहे.
आयएसआयच्या सांगण्यावरून काही आणखी गुप्तहेर दक्षिणेत सक्रिय तर नाहीत ना हे बघण्यासाठी अनेक ठिकाणांची निगराणी वाढविण्यात आल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
काही काळासाठी कोलंबो येथील पाक उच्चायुक्तामध्ये व्हिसा कौन्सिलर म्हणून काम करीत असलेला आमिर जुबेर सिद्दीकी याला इस्लामाबादला परत पाठविले होते. तो भारताविरुद्ध कारवाया करीत होता. त्यामुळे भारताने श्रीलंकेवर यासाठी दबाव आणला होता. सिद्दीकी श्रीलंकेतील आपला कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर परत आल्याचे वृत्त श्रीलंकेतील काही वृत्तपत्रांनी कोलंबोतील पाकिस्तानी प्रेस अताशे दाऊद एहतेशामच्या हवाल्याने दिले आहे.
(लोकमत न्यूज नेटवर्क)

Web Title: After the arrest of the Pak Heritage, the security of the super-south

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.