शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत द्वेष्टा...! डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर पहिला वार; ६ भारतीय ऑईल कंपन्यांवर निर्बंध लादले...
2
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
3
सलवार सूट घातला, त्यावर बुरखा चढवला अन् महिला डॉक्टरच्या घरात घुसून ७ वेळा चाकूने वार केला; नेमकं प्रकरण काय?
4
अरे ही कसली आई! १५ महिन्यांच्या लेकाला बस स्टँडवर सोडलं अन् इन्स्टा बॉयफ्रेंडसोबत पळाली
5
जुनी मैत्रिण ४ वर्षांनी पुन्हा भेटली, एकांतात भेटायला बोलावलं; बंद खोलीत तिला कायमचं संपवलं, मग... 
6
Video - क्रूरतेचा कळस! 'ती' जीव वाचवण्यासाठी हाता-पाया पडली पण 'तो' अमानुषपणे मारत राहिला
7
Video - पावसाचे थैमान! पुरामध्ये ३० तास अडकली शाळेची बस, १०० जणांना वाचवण्यात यश
8
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
9
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
10
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
11
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
12
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
13
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
14
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
15
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
16
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
17
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
18
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
19
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
20
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप

पुरूषांच्या कृत्यांचा नेहमी स्त्रियांना त्रास का? आरोपीचे घर तोडल्याने उर्मिला मातोंडकर संतापली

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2023 18:21 IST

कालपासून सोशल मीडियावर एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

नवी दिल्ली : एका आदिवासी युवकावर एक मद्यधुंद अवस्थेतील व्यक्ती लघवी करत असल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. मध्य प्रदेशात घडलेल्या या घटनेनंतर अनेकांनी संताप व्यक्त केला. माणुसकीला काळीमा फासणारी ही अत्यंत संतापजनक घटना पाहून राज्याचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनीही तात्काळ पोलिसांना निर्देश दिले होते. हातात सिगारेट असलेली एक मद्यधुंद व्यक्ती, पायऱ्यांवर बसलेल्या एका व्यक्तीच्या अंगावर लघवी करत असल्याचे व्हिडीओत दिसून येते. मध्य प्रदेशातील सिधी जिल्ह्यात ही घटना घडली. घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आणि मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर आता त्या विकृत व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. याशिवाय आरोपीच्या घरावर बुलडोझर देखील चालवण्यात आला. पण आता आरोपीच्या घरच्यांचा टाहो पाहून अभिनेत्री उर्मिला मातोंडकरने आवाज उठवला आहे. 

दरम्यान, आरोपी हा भाजपा कार्यकर्ता असून अनेक नेत्यांसमवेतचे त्याचे फोटोही समोर आले आहेत. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या आदेशानंतर आरोपीवर अटकेची कारवाई करण्यात आली. त्यानंतर, काही तासांतच पोलिसांनी संबंधित व्यक्तीचा शोध घेऊन त्याला अटक केली. पोलिसांनी अटक केल्यानंतरही त्याच्यातील आकूडपणा चालताना दिसून येतो. प्रवेश शुक्ला असे या आरोपी व्यक्तीचे नाव असून तो आमदार केदार शुक्ला यांचा प्रतिनिधी असल्याचीही माहिती समोर आली आहे. मात्र, माझा व त्याचा संबंध नसल्याचे आमदार केदार शुक्ला यांनी स्पष्ट केले. अटकेची कारवाई झाल्यानंतर मध्य प्रदेश सरकारने आरोपीच्या घरावर बुलडोझर चालवला.

आरोपीचे घर तोडल्यानंतर त्याच्या घरच्यांना अश्रू अनावर झाले. पण आरोपीच्या कृत्याची शिक्ष त्याच्या घरच्यांना का? असा प्रश्न बॉलिवूड अभिनेत्री उर्मिला मातोंडकरने केला आहे. आरोपीच्या घरच्यांच्या भावना सांगताना उर्मिलाने म्हटले, "दुर्दैवी आणि दुःखी असून पुरुषांच्या कृत्याचा त्रास नेहमी स्त्रियांना का सहन करावा लागतो. प्रवेश शुक्लाला त्याच्या गुन्ह्याची शिक्षा देण्यासाठी शक्य तितकी कठोर शिक्षा द्यायला हवी होती. पण बुलडोझर हे उत्तर असू शकत नाही कारण कुटुंबातील इतर सर्व निष्पाप आणि दुर्बलांना याचा त्रास होतो."

आरोपीचे घर तोडले

आरोपीचे संतापजनक कृत्य सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओत एक गरीब व्यक्ती पायऱ्यांवर बसलेली दिसत आहे. तिचे केस विस्कटलेले आहेत. निळी जीन्स आणि चेक्सचा शर्ट घातलेला एक माणूस त्याच्यासमोर उभा असल्याचे दिसते. तो सिगारेट ओढत या गरीब व्यक्तीच्या तोंडावर लघवी करत आहे. लघवी करणारा माणूस दारूच्या नशेत असल्याचे उघड झाले. एवढेच नाही, तर मद्यधुंद अवस्थेत लघवी करणारा माणूस एका भाजप नेत्याच्या जवळचा असल्याचे बोलले जात आहे. 

 

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशUrmila Matondkarउर्मिला मातोंडकरbollywoodबॉलिवूडPoliceपोलिस