शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी युवकावर लघवी करणाऱ्याच्या घरावर चालला बुलडोझर; सरकारची मोठी कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2023 15:43 IST

कालपासून सोशल मीडियावर एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

नवी दिल्ली : कालपासून सोशल मीडियावर एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. मध्य प्रदेशात घडलेल्या एका घटनेनंतर अनेकांनी संताप व्यक्त केला. माणुसकीला काळीमा फासणारी ही अत्यंत संतापजनक घटना पाहून राज्याचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनीही तात्काळ पोलिसांना निर्देश दिले होते. हातात सिगारेट असलेली एक मद्यधुंद व्यक्ती, पायऱ्यांवर बसलेल्या एका व्यक्तीच्या अंगावर लघवी करत असल्याचे व्हिडीओत दिसून येते. मध्य प्रदेशातील सिधी जिल्ह्यात ही घटना घडली. घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आणि मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर आता त्या विकृत व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. याशिवाय आरोपीच्या घरावर बुलडोझर देखील चालवण्यात आला. 

बुलडोझर कारवाईदरम्यान, आरोपी हा भाजपा कार्यकर्ता असून अनेक नेत्यांसमवेतचे त्याचे फोटोही समोर आले आहेत. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या आदेशानंतर आरोपीवर अटकेची कारवाई करण्यात आली. त्यानंतर, काही तासांतच पोलिसांनी संबंधित व्यक्तीचा शोध घेऊन त्याला अटक केली. पोलिसांनी अटक केल्यानंतरही त्याच्यातील आकूडपणा चालताना दिसून येतो. प्रवेश शुक्ला असे या आरोपी व्यक्तीचे नाव असून तो आमदार केदार शुक्ला यांचा प्रतिनिधी असल्याचीही माहिती समोर आली आहे. मात्र, माझा व त्याचा संबंध नसल्याचे आमदार केदार शुक्ला यांनी स्पष्ट केले. अटकेची कारवाई झाल्यानंतर मध्य प्रदेश सरकारने आरोपीच्या घरावर बुलडोझर चालवला.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही ट्विट करुन भाजप नेत्यांवर टीका केली आहे. भाजप सत्तेच असताना आदिवासी व्यक्तींवरील अत्याचारात वाढ झाली आहे. मध्य प्रदेशातील एका व्यक्तीच्या अमानवीय कृत्यामुळे माणुसकीला काळीमा फासली गेलीय. भाजपचा आदिवासी आणि दलितांवरील असलेल्या द्वेषाचा हाच खरा चेहरा आहे, जो समोर आलाय, असेही राहुल गांधींनी म्हटले. 

पायऱ्यांवर बसलेल्या व्यक्तींच्या अंगावर केली होती लघवी सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओत एक गरीब व्यक्ती पायऱ्यांवर बसलेली दिसत आहे. तिचे केस विस्कटलेले आहेत. निळी जीन्स आणि चेक्सचा शर्ट घातलेला एक माणूस त्याच्यासमोर उभा असल्याचे दिसते. तो सिगारेट ओढत या गरीब व्यक्तीच्या तोंडावर लघवी करत आहे. लघवी करणारा माणूस दारूच्या नशेत असल्याचे उघड झाले. एवढेच नाही, तर मद्यधुंद अवस्थेत लघवी करणारा माणूस एका भाजप नेत्याच्या जवळचा असल्याचे बोलले जात आहे. 

  

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटक