शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
4
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
5
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
6
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
7
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
8
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
9
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
10
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
11
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
12
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
13
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
14
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
15
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
16
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
17
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
18
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
19
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
20
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...

२० एप्रिलनंतर शेतीची कामे, ग्रामीण उद्योगांसह औद्योगिक वसाहती सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2020 06:22 IST

केंद्राकडून मार्गदर्शिका जारी : सोशल डिस्टन्सिंग पाळणे असेल अनिवार्य

नवी दिल्ली : कोरोनासंबंधीची सर्व पथ्ये पाळून समाजातील काही वर्गांची रोजीरोटी पुन्हा सुरू व्हावी आणि अत्यावश्यक वस्तू व सेवांचा पुरवठाही अव्याहत सुरू राहावा यासाठी वाढीव ‘लॉकडाउन’च्या काळात २० एप्रिलनंतर काय सुरू राहील व बंद असेल याची सविस्तर मार्गदर्शिका केंद्रीय गृहमंत्रालयाने सर्व राज्यांना पाठविली.

नंतर कॅबिनेट सचिवांनी सर्व राज्यांचे मुख्य सचिव व पोलीस महासंचालकांची व्हिडीओ बैठक घेतली. पंतप्रधानांचे प्रधान सचिव, गृहसचिव व आरोग्य मंत्रालयाच्या सचिवांखेरीज सर्व जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, महापालिका आयुक्त व सर्व जिल्ह्यांचे सिव्हिल सर्जनही बैठकीस उपस्थित होते.या सेवा, उद्योगांना असेल परवानगीशेती उद्योग, मनरेगाअत्यावश्यक अशा सर्व प्रकारच्या मालाची वाहतूकशेतमालाची खरेदी-विक्री, शेतमालाच्या बाजार समित्या व मंडयांमध्ये विक्रीखते, खते, कीटकनाशके व बी-बियाणांचे उत्पादन,मासेमारी, दूध व दुग्धजन्य पदार्थ, पशुपालन, कुक्कुटपालनचहा, कॉफी व रबराचे मळे‘मनरेगा’ची कामे (यात जलसिंचन व जलसंधारण कामांना प्राधान्य) व ग्रामीण भागांतील सामायिक सेवा केंद्रेअन्नप्रक्रिया उद्योग, ग्रामीण भागांतील उद्योग, रस्त्यांची कामे, पाटबंधारे प्रकल्प कामे, ग्रामीण भागांत घरांचे व औद्योगिक बांधकामखनिज तेल, आयटी उद्योगएसईझेड, निर्यात प्रोत्साहन क्षेत्रे व औद्योगिक वसहतहार्डवेअर, पॅकिंगसाठी लागणारे सामानई कॉमर्स, आयटी व आयटीआधारित सेवा उद्योग, सरकारी कामासाठी डेटा व कॉल सेंटरबँका, आरोग्य सेवा, वर्तमानपत्रेआरोग्य सेवा, सामाजिक सेवा, ग्राहकोपयोगी सेवारिझर्व्ह बँक, इतर बँका, विमा कंपन्या, शेअर बाजारांशी संबंधित संस्था.कोळसा व अन्य खनिजांच्या खाणी तसेच खनिज तेलाचे उत्पादन.पोस्ट आॅफिसेस. कुरिअर सेवा, वर्तमानपत्रेहे मात्र सर्व बंदच राहीलमेट्रो व लोकलसह रेल्वेची सर्व प्रवासी वाहतूकरस्ता मार्गाने होणारी खासगीव सार्वजनिक प्रवासी वाहतूकटॅक्सी, रिक्षा व ओला-उबरसारख्या अ‍ॅपआधारित प्रवासी सेवादेशांतर्गत सर्व विमान वाहतूकसामाजिक, राजकीय, क्रीडाविषयक, शैक्षणिक, धार्मिक, सांस्कृतिक यासहगर्दी होईल असा अन्य कोणताही कार्यक्रमविशेष परवानगी दिलेल्यांखेरीज अन्य व्यावसायिक व औद्योगिक आस्थापनेसर्व शाळा, कॉलेजे, विद्यापीठे, अन्य प्रशिक्षण संस्था व कोचिंग क्लाससर्व धार्मिकव प्रार्थनास्थळेवैद्यकीय कारणाखेरीज लोकांचे आंतरजिल्हाव आंतरराज्य येणे-जाणेविशेष परवानगी दिलेल्यांखेरीज सर्व निवासी हॉटेल, लॉज, बोर्डिंग हाऊस व वसतिगृहांसह ‘हॉस्पिटॅलिटी’ उद्योगसर्व चित्रपटगृहे, नाट्यगृहे, सेमिनार स्थळे, मॉल, शॉपिंग कॉम्प्लेक्स, व्यायामशाळा व जिम, स्वीमिंग पूल, उद्याने, थीम पार्क, बार आणि उपाहारगृहेअंत्ययात्रेला जास्तीत जास्त २० लोकांना परवानगीअधिक कडक निर्बंध : जाहीर केलेले ‘हॉटस्पॉट’ वा वेगाने संसर्ग होत असलेले घोषित ‘कन्टेन्मेंटझोन’मध्ये इतर ठिकाणांपेक्षा कडक निर्बंध असतील. येण्या-जाण्यास पूर्ण मज्जाव असेल.यामुळे शेतकरी आणि विशेषत: ग्रामीण भागात राहणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. परंतु या सेवा सुरू ठेवताना तसेच संबंधितकार्यालयांमध्ये काम करताना सर्वांना सोशल डिस्टन्सिंगसह कोरोनासंबंधीची अन्य बंधने पाळणेही अनिवार्य असणार आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीcorona virusकोरोना वायरस बातम्याMIDCएमआयडीसीFarmerशेतकरी