शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

४५ वर्षांनी झाले हिडकल जलाशयातील विठ्ठलाचे दर्शन, पर्यटकांची गर्दी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2023 14:06 IST

विठ्ठल मंदिराच्या काळ्या दगडांच्या भव्य दर्शनीय भागाचे बांधकाम १२ व्या आणि १३ व्या शतकातील प्रख्यात वैशिष्ट्यपूर्ण अशा हेमाडपंती आहे.

बेळगाव : यंदा मान्सून अतिशय लांबणीवर पडला असून, बेळगावला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांनीही तळ गाठायला सुरुवात केली आहे. जुलै महिना उजाडला तरी अद्याप पावसाने हजेरी लावली नाही. जोरदार पावसाकडे आशेने डोळे लावून बसलेल्या प्रत्येकाकडून पावसाची प्रतीक्षा करण्यात येत आहे. मात्र, जून महिन्यात केवळ पावसाचा शिडकावाच नागरिकांना अनुभवता आला आहे.सध्या मान्सून लांबणीवर पडल्यामुळे हिडकल जलाशयातील पाणीसाठादेखील कमी झाला असून, जलाशयाचे पात्र कोरडे पडू लागले आहे. या जलाशयाच्या आत असणारे श्री विठ्ठल मंदिर पुन्हा वर आले आहे. हिडकल जलाशयातील पाणी साठ्याने तळ गाठण्यास सुरुवात केल्यामुळे वर्षभर पाण्यात बुडालेले भव्य असे विठ्ठल मंदिर पाण्याबाहेर आले आहे. त्यामुळे गावकरी आणि पर्यटकांना मंदिरात जाऊन देवदर्शन घेण्याची संधी प्राप्त झाली आहे.हिडकल जलाशयाचे बांधकाम १९७७ मध्ये जेव्हा पूर्ण झाले, तेव्हा त्याच्या पाण्याने हिडकल आणि हुन्नूर ही दोन गावे पाण्याखाली गेली. येथील श्री विठ्ठल मंदिरदेखील तब्बल ४५ वर्षे पाण्याखाली बुडालेले होते. विठ्ठल मंदिराच्या काळ्या दगडांच्या भव्य दर्शनीय भागाचे बांधकाम १२ व्या आणि १३ व्या शतकातील प्रख्यात वैशिष्ट्यपूर्ण अशा हेमाडपंती आहे.पाण्यात बुडवून राहिल्यामुळे कालांतराने मंदिराच्या बाह्य भिंतींचे नुकसान झाले आहे. दरवर्षी उन्हाळ्यात जलाशयाचे पाणी कमी झाले की या मंदिराचे दर्शन घडत असते. मात्र, यंदा मान्सूनच्या पावसाने दीर्घकाळ दडी मारल्यामुळे श्री विठ्ठल मंदिर पूर्णपणे पाण्याबाहेर येऊन भक्तमंडळी आणि पर्यटकांना थेट मंदिरात जाऊन देवदर्शन घेण्याची संधी प्राप्त झाली आहे.४०-४५ वर्षांनंतर मंदिरातील विठ्ठलाचे दर्शन घेऊन वृद्धाश्रमाच्या आजी-आजोबांनी समाधान व्यक्त केले. यंदाच्या लांबलेल्या मान्सूनमुळे सर्वत्र पाणी टंचाईचे सावट पसरले आहे. यावेळी माजी महापौर विजय मोरे, वसंत बालिगा, विनायक जैनोजी, लक्ष्मण चौगुले, विनायक पाटील, शॅरेल मोरे, मारिया मोरे, विजया पाटील आदींनी दर्शन घेतले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरbelgaonबेळगावbelgaum-pcबेळगाव