शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाच्या निमित्तानं 25 वर्षांनंतर बहुजन समाज पार्टी-समाजवादी पार्टीचं मनोमीलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2018 15:54 IST

उत्तर प्रदेशमध्ये गेल्या 25 वर्षांपासून एकमेकांच्या विरोधात असलेले समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टी गोरखपूर आणि फुलपूर लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी एकत्र आले आहेत.

गोरखपूर- उत्तर प्रदेशमध्ये गेल्या 25 वर्षांपासून एकमेकांच्या विरोधात असलेले समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टी गोरखपूर आणि फुलपूर लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी एकत्र आले आहेत. गोरखपूर आणि फुलपूरच्या लोकसभेच्या पोटनिवडणुका एसपी आणि बीएसपी आघाडी करून लढवणार आहेत. तसेच बहुजन समाज पार्टी राज्यसभेतही समाजवादी पार्टीच्या उमेदवारांना समर्थन देणार आहे.गोरखपूरमध्ये झालेल्या बहुजन समाज पार्टीच्या बैठकीत समाजवादी पार्टीच्या उमेदवारांना समर्थन देण्यावर निर्णय घेण्यात आला आहे. ईशान्येकडील राज्यांमध्ये भाजपानं मिळवलेल्या घवघवीत यशानंतर भाजपाला उत्तर प्रदेशमध्ये आव्हान मिळण्याची शक्यता आहे. गोरखपूर आणि फुलपूर लोकसभेच्या पोटनिवडणुकांसाठी 11 मार्च रोजी मतदान होणार असून, 14 मार्च रोजी मतमोजणी केली जाणार आहे. दोन्ही जागा भाजपासाठी महत्त्वाच्या आहेत. गोरखपूरमधून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ खासदार होते. तर फुलपूरमधून उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य खासदार होते. या दोघांच्या राजीनाम्यानंतर इथे पोटनिवडणुका होत आहेत.  आता या पोटनिवडणुकीच्या माध्यमातून भाजपाला धोबीपछाड देण्यासाठी बहुजन समाज पार्टीनं समाजवादी पार्टीला पाठिंबा दिल्याची घोषणा केली आहे.

राज्यसभेसाठी मायावतींनी दिलं समर्थन ?राज्यसभेत पुन्हा जाण्यासाठी मायावतींनी समाजवादी पार्टीला पाठिंबा दिला आहे. उत्तर प्रदेशमध्ये 23 मार्च रोजी 10 राज्यसभेच्या जागांसाठी निवडणुका होणार आहेत. 19 आमदार असलेला बहुजन समाज पार्टी एकही जागा जिंकण्याच्या स्थितीत नाही. अशातच त्यांना एका जागेवर समाजवादी पार्टीच्या समर्थनाची गरज लागणार आहे.रामाच्या लाटेनंतर आता मोदी लाटेत एसपी-बीएसपी आले एकत्र1993मध्ये बहुजन समाज पार्टी आणि समाजवादी पार्टी एकत्र निवडणुका लढले आहेत. त्यावेळी रामाच्या लाटेला रोखण्याच्या दोन्ही पक्षांचा उद्देश होता. त्यावेळी बहुजन समाज पार्टी आणि समाजवादी पार्टीच्या आघाडीला 176 जागांवर विजय मिळाला होता. तर भाजपाकडे 177 जागा होत्या. परंतु गेस्ट हाऊस कांडनंतर दोन्ही पक्षांची आघाडी संपुष्टात आली. त्यानंतर दोन्ही पक्ष गेल्या 25 वर्षांत कधीही एकत्र आले नाहीत. अखिलेश यादव यांनी जाहीर भाषणात मायावतींना आघाडी करण्याचा प्रस्ताव दिला होता. पण मायावतींनी त्यावेळी तो स्वीकारला नव्हता. 

टॅग्स :Samajwadi Partyसमाजवादी पार्टीmayawatiमायावती