शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
3
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
4
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
5
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
6
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
7
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
8
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
9
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
10
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
11
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
12
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
13
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
14
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
15
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
16
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
17
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
18
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
19
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली

२२ वर्षांनी घेतला वडिलांच्या हत्येचा बदला, मुलाने खुन्याला त्याच स्टाईलनं संपवलं   

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2024 18:38 IST

Crime News: हत्येचा बदला हत्या, असं म्हणत आपल्या जवळच्या व्यक्तीच्या हत्येचा बदला घेतल्याच्या बातम्या तुम्ही अनेकदा वाचल्या असतील. अशा कथा तुम्ही चित्रपटांमधूनही पाहिल्या असतील. दरम्यान, एका मुलाने त्याचा वडिलांच्या हत्येचा तब्बल २२ वर्षांनी बदला घेत आरोपीला सिनेस्टाईलने संपवल्याची घटना गुजरातमध्ये घडली आहे.

हत्येचा बदला हत्या, असं म्हणत आपल्या जवळच्या व्यक्तीच्या हत्येचा बदला घेतल्याच्या बातम्या तुम्ही अनेकदा वाचल्या असतील. अशा कथा तुम्ही चित्रपटांमधूनही पाहिल्या असतील. दरम्यान, एका मुलाने त्याचा वडिलांच्या हत्येचा तब्बल २२ वर्षांनी बदला घेत आरोपीला सिनेस्टाईलने संपवल्याची घटना गुजरातमध्ये घडली आहे. आरोपी मुलगा त्याच्या वडिलांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी तब्बल २२ वर्षे वाट पाहत होता. अखेर २२ वर्षांनंतर तशी संधी चालून येताच त्याने वडिलांची हत्या करणाऱ्या व्यक्तीला ज्या प्रकारे वडिलांची हत्या करण्यात आली होती, त्याच पद्धतीचा अवलंब करून ठार मारले. 

हत्येचा बदला हत्या करून घेतल्याची ही घटना अहमदाबाद येथे घडली आहे. तसेच एका ३० वर्षांच्या तरुणाला हत्येच्या प्रकरणात पकडण्यात आल्यानंतर या संपूर्ण घटनेचा उलगडा झाला आहे. याबाबत मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार मंगळवारी ५० वर्षांचा नखट सिंह भाटी हा सायकलवरून जात असताना एका पिकअप टेम्पोने त्याला चिरडले. तो अहमदाबादमधील एका वसाहतीमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होता. ही घटना घडल्यानंतर आरोपी गोपाल सिंह भाटी याने घटनास्थळावरून पळ काढण्याचा प्रयत्न केला होता. मात्र पोलिसांनी त्याला काही अंतरावरच पकडले होते. तसेच पोलिसांनी प्रथम हा अपघात असल्याच्या दृष्टीने तपास सुरू केला होता. तसेच आरोपीवर बेदरकारपणे वाहन चाववून अपघात घडवल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला होता.

मात्र पोलिसांनी जेव्हा या प्रकरणाचा सखोल तपास केला तेव्हा वेगळंच सत्य समोर आलं. पोलिसांनी सांगितले क, २००२ मध्ये आरोपी गोपाल सिंह भाटी याचे वडील हरी सिंह भाटी यांची राजस्थानमधील जैसलमेर येथे ट्रकखाली चिरडून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात नखट सिंह भाटी आणि त्याच्या चार भावांना दोषी ठरवून सात वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. ही घटना घडली तेव्हा गोपाल हा आठ वर्षांचा होता. तेव्हापासूनच तो वडिलांच्या हत्येचा बदला घेण्याचा विचार करत होता. खून, हत्या याच्या गोष्टी ऐकूनच तो लहानाचा मोठा झाला होता. तसेच बलदा घेण्यासाठी योग्य वेळेची वाट पाहत होता.

दरम्यान, वडिलांच्या खुन्याची हत्या करण्यासाठी गोलाप यांने मागच्या आठवड्यात बनासकाठा येथील एका गावातून ८ लाख रुपये मोजून एक पिकअप ट्रक खरेदी केला. तसेच तो मागच्या आठवड्यात मृत नखट याच्या घरी सारखा ये-जा करत होता. त्यामुळे तो हत्येपूर्वी आरोपीवर पाळत ठेवून होता, हे स्पष्ट झाले आहे.  दरम्यान, गुन्हा कबूल करताना आरोपीने दोन्ही कुटुंबं आणि त्यांच्या गावांमध्ये असलेल्या वैराची माहिती दिली. आता आरोपी गोपाल याला बोदकदेव पोलिसांकडे सोपवण्यात येणार आहे, तसेच त्याच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला जाणार आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीGujaratगुजरातFamilyपरिवार