शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

Afghanistan Crisis: सगळं संपलंय... काबुलहून दिल्लीत उतरताच अफगाणी शीख खासदाराला रडू कोसळलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2021 13:32 IST

Afghanistan Crisis: गाझियाबादच्या हिंडन एअरबेसवर वायुसेनेचं हे विमान उतरलं आहे. याठिकाणी वायुसेनेकडून सर्व नागरिकांच्या उतरविण्यात आलं असून त्यांची सर्व काळजी वायु सेनेनेच घेतली.

ठळक मुद्देअफगाणिस्तानमध्ये गेल्या 20 वर्षात जे काही झाले होते, ते सर्व संपलं चाललंय. सगळं शुन्यावर यायलंय, अशी माहिती देताना त्यांना हुंदका आवरता आला नाही

नवी दिल्ली - अफगाणिस्तानवर तालिबान्यांनी कब्जा केल्यानंतर तेथील परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होताना दिसत आहे. त्यामुळे, अफगाणिस्तानातील भारतीयांना मायदेशी आणण्याचं मिशन भारतीय हवाई दलानं हाती घेतलेलं आहे. यात भारतीय हवाई दलाला मोठं यश आलं आहे. भारतीय हवाई दलाचं सी-१७ विमान आज सकाळी काबुलहून १६८ जणांना घेऊन भारतात दाखल झालं आहे. भारतात दाखल झालेल्या या विमानात हिंदू शीख आणि अफगाणी नागरिकही आले आहेत. त्यापैकीच, एक असलेल्या अफगाणीस्तानच्या शीख खासदाराचे परिस्थितीचं गांभीर्य सांगताना डोळे पाणावले.   

गाझियाबादच्या हिंडन एअरबेसवर वायुसेनेचं हे विमान उतरलं आहे. याठिकाणी वायुसेनेकडून सर्व नागरिकांच्या उतरविण्यात आलं असून त्यांची सर्व काळजी वायु सेनेनेच घेतली. या 168 जणांमध्ये अनेक लहान मुलं, महिला आणि अफगाणिस्तानातील भारतीय दूतावासात काम करणाऱ्यांचाही समावेश आहे. या विमानात अफगाणिस्तानमधील शीख खासदार नरेंद्रसिंह खालसा हेही हजर होते. एअरबेसवर विमान उतरताच पत्रकारांनी नरेंद्रसिंह यांच्याशी संवाद साधला. यावेळी, अफगाणिस्तानमधील परिस्थितीसंदर्भात प्रश्न विचारले. त्यावेळी, खासदार खालसा यांना अश्रू अनावर झाले. अफगाणिस्तानमध्ये गेल्या 20 वर्षात जे काही झाले होते, ते सर्व संपलं चाललंय. सगळं शुन्यावर यायलंय, अशी माहिती देताना त्यांना हुंदका आवरता आला नाही. काबुलहून आज सकाळी दिल्लीतील हिंडन एअरबेसवर आलेल्या 168 नागरिकांमध्ये 107 भारतीय नागरिकांचा समावेश आहे. तर, काही हिंदू-शीख आणि अफगाणी नागरिकही आहेत. एका अफगाणी महिलेने एएनआयसोबत संवाद साधताना भयंकर आपबिती सांगितली. अफगाणिस्तानमध्ये परिस्थिती अत्यंत खराब आहे, त्यामुळेच मी माझ्या मुलीसह नातवंडांना घेऊन भारतात आले आहे. आपले भारतीय बंधु-भगिनी आमच्या बचावासाठी पुढे सरसावले. तालिबान्यांनी माझं घर जाळलं, भारताने आम्हाला आसरा दिला, त्यासाठी मी भारताचे आभार मानते, असं दु:ख या पीडित महिलेनं सांगितलं.   

८७ प्रवाशांना घेऊन आणखी एक विमान येतंय

वायुसेनेनं सी-१७ विमान भारतात दाखल झाल्यानंतर एअर इंडियाचं एका विमानानं शनिवारी ८७ भारतीयांना घेऊन काबुल विमानतळावरुन उड्डाण केलं आहे. तेही विमान लवकरच भारतात दाखल होणार आहे. सुत्रांच्या माहितीनुसार कागदपत्रांची पडताळणी आणि काबुल विमानतळ सध्या अमेरिकेच्या ताब्यात असल्यानं संपूर्ण प्रक्रियेला वेळ लागत असल्याची माहिती समोर आली आहे. 

गेल्या २४ तासांत ३९० भारतीयांची काबुलहून सुटका

गेल्या २४ तासांत एकूण ३९० भारतीयांची काबुलहून सुखरूपरित्या सुटका करण्यात आली आहे. आज सकाळी १६८ जणांना घेऊन हवाई दलाचं विमान गाझियाबादमध्ये दाखल झालं आहे. तर ८७ जणांना घेऊन येणारं एअर इंडियाचं विमान आज दिल्ली विमानतळावर दाखल होणार आहे. याआधी १३५ जणांची सुटका करण्यात आली होती. अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या सर्व भारतीयांना सुखरूपपणे मायदेशी आणण्याकडे भारतीय परराष्ट्र मंत्रालय अतिशय काटेकोरपणे लक्ष ठेवून असल्याचं मंत्रालयाकडून सांगण्यात आलं आहे.  

टॅग्स :Afghanistanअफगाणिस्तानMember of parliamentखासदारTalibanतालिबानindian air forceभारतीय हवाई दल