शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

है तैय्यार हम... एअर मार्शल धनोआंकडून वायू दलास सतर्कतेच्या सूचना 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2019 15:23 IST

जम्मू काश्मीरमधील केंद्र सरकारची पावलं आणि कलम 370 हटविल्यानंतर पाकिस्तान सैरभैर झाला आहे

ठळक मुद्देजम्मू काश्मीरमधील केंद्र सरकारची पावलं आणि कलम 370 हटविल्यानंतर पाकिस्तान सैरभैर झाला आहेसीमारेषेवरील तणाव लक्षात घेता, वायू दलास अलर्ट राहण्याच्या सूचना त्यांनी केल्या आहेत.

मुंबई - भारताने कलम 370 हटविल्याच्या पार्श्वभूमीवर सीमारेषेवर तणावाचे वातावरण तयार झाले आहे. तर, इम्रान खान यांच्या पोकळ धमक्यांना भारताने कसलिही भीक घातली नाही. त्यामुळे पाकिस्तान सरकार सैरभैर झालं आहे. आम्ही युद्धजन्य स्थितीला सामोरे जाण्यास सज्ज आहोत, असे उद्गार पाकिस्तानी लष्कराचे प्रवक्ते मेजर जनरल आसिफ गफूर यांनी म्हटले होते. त्यांच्यासमवेत पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह मोहम्मद कुरेशी हेही होते. त्याला राजनाथसिंह यांनी त्याच भाषेत उत्तर दिले होते. त्यानंतर, आता एअर मार्शल धनोआ यांनीही सज्ज असल्याचं म्हटलंय. 

जम्मू काश्मीरमधील केंद्र सरकारची पावलं आणि कलम 370 हटविल्यानंतर पाकिस्तान सैरभैर झाला आहे. इम्रान खान सरकारने पाकिस्तानी लष्कराचे प्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांचा कार्यकाळ 3 वर्षांसाठी वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पाक पंतप्रधान कार्यालयाकडून दिलेल्या माहितीनुसार देशात शांती प्रस्थापित करण्यासाठी इम्रान खान यांनी हा निर्णय घेतला आहे. जम्मू काश्मीरमधील परिस्थितीमुळे पाकिस्तान सरकारने घेतलेला हा निर्णय महत्वाचा आहे. अलिकडेच पाकिस्तानला संयुक्त राष्ट्र संघात फटकारण्यात आलं आहे. जम्मू काश्मीर प्रकरणावर पाकिस्तानला चीनशिवाय इतर कोणत्याही देशांनी पाठिंबा दिला नाही. त्यामुळे पाकिस्तानचा तिळपापड झाला आहे. त्याच पार्श्वभूमीवर भारतीय वायू दलाचे प्रमुख एअर मार्शल बीएस. धनोआ यांनी वायू दलाला सतर्क आणि सावधानतेचा इशारा दिला आहे. 

सीमारेषेवरील तणाव लक्षात घेता, वायू दलास अलर्ट राहण्याच्या सूचना त्यांनी केल्या आहेत. भारतीय वायू सेना नेहमीच तयारीत असते. शत्रूराष्ट्राचा हवाई हल्ला परतविण्यासाठी आम्ही नेहमी सज्ज असून आपली वायू सेना तत्पर आहे. केवळ युद्धासाठीच नाही, तर इतर वेळीही वायू दलाचे विमान सज्ज असते, असे धनोआ यांनी सांगितले. माध्यम प्रतिनिधींशी बोलताना धनोआ यांनी वायू दल सतर्क आणि सज्ज असल्याचं म्हटलंय. दरम्यान, गेल्याच आठवड्यात लष्करप्रमुख बिपीन रावत यांनीही भारतीय सैन्य आपल्या पोजीशनमध्ये असून सध्या सीमारेषेवर शांत वातावरण असल्याचं म्हटलं होतं. 

 

टॅग्स :airforceहवाईदलBorderसीमारेषाIndiaभारतPakistanपाकिस्तानImran Khanइम्रान खानArticle 370कलम 370