संशयाचा लाभ, आरोपी निर्दोष
By Admin | Updated: February 20, 2015 01:10 IST2015-02-20T01:10:20+5:302015-02-20T01:10:20+5:30
नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने हत्याप्रकरणातील एका आरोपीला संशयाचा लाभ देऊन निर्दोष मुक्त केले आहे.

संशयाचा लाभ, आरोपी निर्दोष
न गपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने हत्याप्रकरणातील एका आरोपीला संशयाचा लाभ देऊन निर्दोष मुक्त केले आहे.जगन्नाथ पुंडलिक सरोदे (६०) असे आरोपीचे नाव असून तो पाचमोरी, ता. अकोला येथील रहिवासी आहे. त्याच्यावर संतोष तिवारी यांची हत्या केल्याचा आरोप होता. २८ जून २००० रोजी संतोष यांना चाकू भोसकून जखमी करण्यात आले होते. २२ जुलै रोजी त्यांचा मृत्यू झाला होता. १७ ऑगस्ट २००१ रोजी अकोला सत्र न्यायालयाने आरोपीला भादंविच्या कलम ३०२ (हत्या) अंतर्गत जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. याविरुद्ध आरोपीने उच्च न्यायालयात अपील केले होते. उच्च न्यायालयाने प्रकरणातील विविध बाबी लक्षात घेता आरोपीचे अपील स्वीकारून सत्र न्यायालयाचा निर्णय रद्द केला. आकोट पोलिसांनी घटनेचा तपास केला होता. आरोपीतर्फे ॲड. राजेंद्र डागा यांनी बाजू मांडली.