"राहुल गांधी पंतप्रधानपदाचे प्रबळ दावेदार; अडवाणींच्या राम रथयात्रेसारखी भारत जोडो यात्रा", शत्रुघ्न सिन्हांकडून कौतुक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2023 09:40 AM2023-01-10T09:40:53+5:302023-01-10T09:41:51+5:30

तृणमूल काँग्रेसचे (TMC) नेते आणि लोकसभा खासदार शत्रुघ्न सिन्हा (Shatrughan Sinha) यांनी राहुल गांधी यांच्या 'भारत जोडो यात्रे'चे कौतुक केले आहे.

Advani Ram Rath Yatra Like Bharat Jodo Yatra Rahul Gandhi Emerged As Frontrunner For Pm Post In Oppn Camp Says Tmc Shatrughan Sinha | "राहुल गांधी पंतप्रधानपदाचे प्रबळ दावेदार; अडवाणींच्या राम रथयात्रेसारखी भारत जोडो यात्रा", शत्रुघ्न सिन्हांकडून कौतुक!

"राहुल गांधी पंतप्रधानपदाचे प्रबळ दावेदार; अडवाणींच्या राम रथयात्रेसारखी भारत जोडो यात्रा", शत्रुघ्न सिन्हांकडून कौतुक!

googlenewsNext

नवी दिल्ली : काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या 'भारत जोडो यात्रे'ला (Bharat Jodo Yatra) देशभरातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. यातच आता तृणमूल काँग्रेसचे (TMC) नेते आणि लोकसभा खासदार शत्रुघ्न सिन्हा (Shatrughan Sinha) यांनी राहुल गांधी यांच्या 'भारत जोडो यात्रे'चे कौतुक केले आहे.

राहुल गांधी हे विरोधी पक्षातून 'पंतप्रधानपदाचे प्रबळ दावेदार' दिसून येत आहेत, असे शत्रुघ्न सिन्हा म्हणाले. तसेच, राहुल गांधींची 3,570 किलोमीटरची यात्रा ऐतिहासिक यात्रांपैकी एक आहे आणि या यात्रेची तुलना 1990 च्या दशकाच्या सुरुवातीला झालेल्या लालकृष्ण अडवाणींच्या 'राम रथयात्रे'शी केली जाऊ शकते, असे शत्रुघ्न सिन्हा म्हटले आहे. 

शत्रुघ्न सिन्हा  म्हणाले, "या यात्रेतून राहुल गांधी एक प्रमुख आणि आदरणीय नेते म्हणून उदयास आले आहेत. ते आता पंतप्रधानपदासाठी अत्यंत सक्षम दिसत आहेत. ते (राहुल गांधी) आता विरोधी पक्षातील (पंतप्रधानपदासाठी) आघाडीचे नेते बनले आहेत. त्यांच्या समर्थनार्थ लाखो लोक येत आहेत. त्यांनी आपले नेतृत्वगुण सिद्ध केले आहेत. लोकांनी त्यांना नेता म्हणून स्वीकारले आहे."

दरम्यान, तीन महिन्यांत दुसऱ्यांदा शत्रुघ्न सिन्हा यांनी राहुल गांधी आणि त्यांच्या 'भारत जोडो यात्रे'चे कौतुक केले आहे. या यात्रेमुळे पुढील लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला मते मिळतील का, असा प्रश्न शत्रुघ्न सिन्हा यांना विचारला असता त्यांनी सकारात्कम उत्तर दिले. राहुल गांधींना ज्या प्रकारचा पाठिंबा मिळत आहे, तो अभूतपूर्व आहे. त्याचे 20 टक्के मतांमध्ये रूपांतर झाले तर ते देशासाठी आणि विशेषत: काँग्रेससाठी चांगले होईल, असे शत्रुघ्न सिन्हा यांनी सांगितले.

याचबरोबर, शत्रुघ्न सिन्हा यांनी लालकृष्ण अडवाणी आणि वायएस जगन मोहन रेड्डी यांच्या आंध्र प्रदेशातील राजकीय दौऱ्यांचा उल्लेख केला. "आपण भूतकाळात पाहिले आहे की किती लांबचा प्रवास मतांचे रूपांतर करण्यात मदत करतो. आंध्र प्रदेशात लालकृष्ण अडवाणी आणि जगन मोहन रेड्डी यांच्या यात्रा आपण पाहिल्या आहेत.", असे शत्रुघ्न सिन्हा म्हणाले. तसेच, जेव्हा ममता बॅनर्जी पश्चिम बंगालमध्ये जखमी झाल्या होत्या आणि नंतर त्यांनी व्हीलचेअरवर बसून प्रचार केला, तेव्हा तुम्ही 2021 च्या विधानसभा निवडणुकीचे निकाल पाहिले आहेत, असेही शत्रुघ्न सिन्हा म्हणाले.

शत्रुघ्न सिन्हा यांनी 1980 मध्ये भाजपमध्ये केला होता प्रवेश
विशेष म्हणजे, शत्रुघ्न सिन्हा 1980 च्या दशकात भारतीय जनता पक्ष (भाजप) मध्ये होते. अटलबिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी यांच्या काळात ते  भाजपचे स्टार प्रचारक होते. पटना साहिबचे दोन वेळा खासदार राहिलेल्या शत्रुघ्न सिन्हा यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी पक्ष नेतृत्वाशी मतभेद झाल्यानंतर भाजपला रामराम ठोकला आणि काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर 2022 मध्ये त्यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला. शत्रुघ्न सिन्हा हे आसनसोल लोकसभा मतदारसंघासाठी झालेल्या पोटनिवडणुकीत तृणमूल काँग्रेसच्या तिकीटावर लोकसभेत निवडून गेले आहेत.

Web Title: Advani Ram Rath Yatra Like Bharat Jodo Yatra Rahul Gandhi Emerged As Frontrunner For Pm Post In Oppn Camp Says Tmc Shatrughan Sinha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.