गंभीर गुन्ह्यांसाठी १६ ते १८ वर्षे वयाची मुले ठरतील प्रौढ
By Admin | Updated: April 23, 2015 06:14 IST2015-04-23T06:14:26+5:302015-04-23T06:14:26+5:30
गंभीर आणि घृणास्पद गुन्हे करणाऱ्या १६ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांना कोणतीही दयामाया न दाखविता त्यांच्यावर सज्ञान-वयस्कांसाठी असलेल्या

गंभीर गुन्ह्यांसाठी १६ ते १८ वर्षे वयाची मुले ठरतील प्रौढ
नवी दिल्ली : गंभीर आणि घृणास्पद गुन्हे करणाऱ्या १६ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांना कोणतीही दयामाया न दाखविता त्यांच्यावर सज्ञान-वयस्कांसाठी असलेल्या कायद्यानुसार खटला दाखल करण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी मंजुरी दिली. दिल्लीतील निर्भया प्रकरणातील एक आरोपी अल्पवयीन असल्याने त्यावेळी कायदा दुरुस्तीचा मुद्दा लावून धरण्यात आला होता. सरकारने विविध समित्यांकडून अभ्यास करीत कायद्यातील सुधारणेबाबत विचार चालविला होता.
गंभीर गुन्हे करणाऱ्या किशोरवयीन मुलांचा वयोगट १६ ते १८ वर्षे असल्यास त्यांच्यावर वयस्कांप्रमाणेच खटला चालविण्यासाठी बाल न्याय(संगोपन आणि संरक्षण) कायद्यातील सुधारणेला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली असल्याचे केंद्रीय दळणवळणमंत्री रविशंकर प्रसाद यांनी या बैठकीनंतर पत्रकारांना सांगितले.