शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
5
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
6
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
7
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
8
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
9
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
10
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
11
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
12
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
13
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
14
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
15
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
16
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
17
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
18
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
19
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
20
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

पाटणा रेल्वे स्थानकावर अचानक सुरू झाला पॉर्न video; ॲडल्ट स्टार्स म्हणाली, ही मीच आहे...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2023 19:03 IST

रविवारी बिहारच्या पाटणा रेल्वे स्थानकावरील टीव्ही स्क्रीनवर अचानक एक पॉर्न व्हिडीओ सुरू झाल्याने एकच खळबळ माजली.

पाटणा : रविवारी बिहारच्या पाटणा रेल्वे स्थानकावरील टीव्ही स्क्रीनवर अचानक एक पॉर्न व्हिडीओ सुरू झाल्याने एकच खळबळ माजली. यानंतर प्रवाशांमध्ये गोंधळ उडाला. याप्रकरणी एका प्रसिद्ध पॉर्न स्टारने एक मजेशीर ट्विट केले आहे. ट्विटचा आनंद घेत तिने लिहिले की, व्हिडीओ क्लिप माझी आहे.

पॉर्न स्टार केंद्र लस्टने मंगळवारी तिचा फोटो ट्विट करत लिहले, "भारत  #BiharRailwayStation...". याशिवाय तिने या ट्विटमध्ये कशाचाही उल्लेख केलेला नाही. यानंतर सर्व युजर्स कमेंट सेक्शनमध्ये ट्विट करू लागले. काही युजर्संनी विचारले की ती क्लिप तुझी आहे का? केंद्र लस्टने यावर लिहिले, "मला आशा आहे की तो माझाच आहे." आता या पॉर्न स्टारचे हे ट्विट खूप व्हायरल होत आहे. 

केंद्र लस्ट सोशल मीडियावर खूप लोकप्रिय आहे. ट्विटरवर तिचे 1.5 दशलक्षाहून अधिक फॉलोअर्स आहेत. तसेच इंस्टाग्रामवर 85 लाखांहून अधिक लोक तिला फॉलो करतात.

जवळपास 3 मिनिटे चालला video बिहारच्या पाटणा रेल्वे स्थानकावर जवळपास तीन मिनिटे अश्‍लील व्हिडीओ चालू असल्याचे सांगितले जात आहे. याप्रकरणी रेल्वे पोलिसांकडून जाहिरात एजन्सीविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला. तसेच डीआरएम प्रभात कुमार यांनी एजन्सीला दंड ठोठावला आहे. एवढेच नाही तर करार देखील रद्द करण्याचे निर्देश दिले आहेत. 

याआधी देखील घडली अशी घटना पाटना जंक्शनच्या जवळपास सर्व प्लॅटफॉर्मवर डझनभर टीव्ही स्क्रीन लावण्यात आल्या आहेत, जेणेकरून प्रवाशांना ट्रेनची माहिती देता येईल. रविवारी घडलेली ही घटना काही पहिलीच घटना नाही. यापूर्वी देखील अशा घटना समोर आल्या आहेत. त्यावेळी अधिकाऱ्यांना नंतर कळले. मात्र यावेळी माहिती मिळताच रेल्वेकडून कारवाई करण्यात आली आहे. कालची संपूर्ण घटना सकाळी 9.56 ते 9.59 या वेळेत प्लॅटफॉर्म क्रमांक दहावर झाली असल्याचे रेल्वे अधिकारी सांगत आहेत. तर काही प्रवासी प्लॅटफॉर्म क्रमांक एकवरही अशी घटना घडली असल्याचे म्हणत आहेत.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :BiharबिहारSocial Viralसोशल व्हायरलmemesमिम्सSocial Mediaसोशल मीडिया