संरक्षणमंत्र्यांनी घेतले अमेठीतील गाव दत्तक

By Admin | Updated: September 19, 2015 22:01 IST2015-09-19T22:01:20+5:302015-09-19T22:01:20+5:30

केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या अमेठी मतदारसंघातील बरौलिया हे गाव दत्तक घेतले आहे.

Adoption of Amethi village by the Defense Minister | संरक्षणमंत्र्यांनी घेतले अमेठीतील गाव दत्तक

संरक्षणमंत्र्यांनी घेतले अमेठीतील गाव दत्तक

अमेठी : केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या अमेठी मतदारसंघातील बरौलिया हे गाव दत्तक घेतले आहे.
भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष दुर्गेश तिवारी यांनी शनिवारी याबाबत माहिती देताना सांगितले की, आदर्श ग्राम योजनेअंतर्गत संरक्षणमंत्र्यांनी बरौलिया हे गाव दत्तक घेऊन त्याच्या विकासाची जबाबदारी स्वीकारली आहे.
हे गाव अमेठीच्या गौरीगंज विधानसभा क्षेत्रात आहे. गोव्याचे माजी मुख्यमंत्री असलेले पर्रीकर हे उत्तर प्रदेशातून राज्यसभेवर सदस्य म्हणून निवडून गेले आहेत. (वृत्तसंस्था)

Web Title: Adoption of Amethi village by the Defense Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.