खडकाळे ग्रामपंचायतींवर चार दिवसांसाठी प्रशासक
By Admin | Updated: August 7, 2015 21:35 IST2015-08-07T21:35:34+5:302015-08-07T21:35:34+5:30
खडकाळे(कामशेत) ग्रामपंचायतींसाटी १९ ऑगस्टला फेर मतदान

खडकाळे ग्रामपंचायतींवर चार दिवसांसाठी प्रशासक
ख काळे(कामशेत) ग्रामपंचायतींसाटी १९ ऑगस्टला फेर मतदान पुणे: मावळ गोळीबार प्रकरणानंतर खडकाळे (कामशेत) येथे येत्या १९ ऑगस्ट रोजी मतदान होत असून, मतदमोजणी २० ऑगस्ट रोजी होणार आहे. त्यानंतर अधिसूचना जाहीर करुन सात दिवसांनी सरपंच पदाची निवडणूक होणार आहे. परंतु खडकाळे ग्रामपंचायतींची मुदत २३ ऑगस्ट रोजी संपत असून, किमान चार दिवसांसाठी ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याची वेळ प्रशासनावर येणार आहे.मावळ तालुक्यातील खडकाळे(कामशेत) येथे मनसेच्या तालुका अध्यक्ष यांच्यावर गोळीबार होऊन यात त्याचा मृत्यु झाला. या प्रकारानंतर संप्तत जमावाने येथील मतदान केंद्रांवर हल्ला करुन यंत्रांची तोडफोड केली. यामुळे दुपार नंतर येथील मतदान प्रक्रिया थांबविण्यात आली. यामुळे येथे फेर मतदान घ्यावे, असा प्रस्ताव जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी राज्य निवडणूक आयोगाला पाठवला होता. खडकाळे गावत एकूण दहा मतदान केंद्र होती, यापैकी सात ठिकाणी फेरमतदान घेण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे येत्या १९ ऑगस्ट रोजी सात केंद्रांसाठी सकाळी ७.३० ते ५.३० या वेळेत फेरमतदान घेण्यात येणार असून, दहा मतदान केंद्रांची मतमोजणी २० ऑगस्ट रोजी तालुक्याच्या ठिकाणी करण्यात येणार असल्याचे राव यांनी सांगितले. या ग्रामपंचायतींची मुदत २३ ऑगस्ट रोजी संपत आहे. मतमोजणी झाल्यानंतर सात दिवसांची अधिसूचना जाहीर करुन नंतर सरपंच पदाची निवडणूक घेण्यात येणार आहे. यासाठी २७ ते २८ ऑगस्ट उजाडणार आहे. त्यामुळे २३ ऑगस्ट नंतर किमान चार दिवसांसाठी येथे प्रशासकाची नेमणूक करावी लागणार आहे.